Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

बुधवार, डिसेंबर २८, २०२२

चंद्रपूरकरांना 200 युनिट विज मोफत द्या; शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार Mahavitaran Bill | Kishor jorgewar




चंद्रपूरकरांना 200 युनिट विज मोफत द्या; शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार - आ. किशोर जोरगेवार

यंग चांदा ब्रिगेडची अभुतपुर्व अधिकार बाईक रॅली विधानभवनावर धडकलीउपमुख्यमंत्र्यांना निवेदन

 चंद्रपूर (Chandrapur)  चंद्रपूर करांना 200 युनिट विज मोफत देण्यात यावे हि मागणी मी विसरलेलो नाही. कारण ही केवळ मागणी नसुन तो आमचा हक्क आहे. हक्कासाठी झालेला उठाव इतिहास घडवतो. आजची ही अधिकार बाईक रॅली चंद्रपूरच्या आंदोलनांच्या इतिहासात नोंदविली जाणार आहे. या मागणीसाठी जिवणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करण्याची माझी तयारी असुन यासाठी मी जेव्हा जेव्हा हाक देईल याच उत्साहात एकत्रित  या असे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Kishor Jorgewar

  चंद्रपूरकरांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावीशेतकऱ्यांना विज मोफत देण्यात यावीरोजगार निर्मितीसाठी उद्योगांना सवलतीच्या दरात विज देण्यात यावी या मागणीसाठी आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागपूर अधिवेशनावर भव्य अधिकार बाईक रॅली काढण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई (अम्मा) यांनी सदर रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर हि भव्य अधिकार बाईक रॅली नागपूरच्या दिशेने रवाना झाली. या रॅलीला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक बलराम डोडाणी, माता महाकाली महोत्सव चे अध्यक्ष अजय जयस्वाल, एमआयडीसी असोसिएशन अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्तामहिला शहर संघटिका वंदना हातगावकरयुथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारपयुवा नेते अमोल शेंडेआदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, छोटा नागपूर चे उपसरपंच रिषभ दुपारे,प्रतिक शिवणकर, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष सलिम शेखयुथ शहर अध्यक्ष राशेद हुसेनप्रा. श्याम हेडाऊ, देवानंद साखरकर, नानाजी नंदनवार, सविता दंडारे, दुर्गा वैरागडे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडेसायली येरणेग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकरघुग्घुस शहर संघटक विलास वनकरआदींची उपस्थिती होती.

  यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीराज्यात सर्वाधिक विज उत्पादन करणाऱ्या जिल्हांमध्ये चंद्रपूर जिल्हाचा समावेश आहे. जवळपास 5 हजार मेग्यावॅट पेक्षा अधिक विज आम्ही निर्माण करतो. ही औष्णिक विज आहे. त्यामुळे यातुन होणारे प्रदुषण प्राण घातक आहे. शेतीला याचे मोठे नुकसाण होत आहे. प्रदूषणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे वयोमान 5 ते 10 वर्षांनी घटले आहे. या औष्णिक विज प्रकल्पातुन होणाऱ्या प्रदुषणाची इतकी मोठी किंमत मोजत असतांनाही केवळ दोन ते अडिच रुपये प्रति युनिट रुपयात तयार होणारी विज आम्हाला 5 ते 15 रुपये प्रति युनिट या दरात विकत घ्यावी लागत आहे. जागापाणीकोळसाआमचाच आणि विजही आम्हीच महाग घ्यायची हा अन्याय आहे. या विरुध्द आम्ही पुर्ण ताकदीने संघटित होउन लढणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. Kishor Jorgewar

   या मागणीसाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. जेथे कायदे बनतात अशा अधिवेशनातही आपण हा विषय वारंवार मांडला आहे. संबंधित मंत्र्यांना सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र याला यश येत नसल्याने चंद्रपूरकरांची भावना संपुर्ण मंत्रीमंडळा पर्यंत पोहचावी यासाठी आपण आज हि बाईल रॅली नागपूर हिवाळी अधिवेशन सुरु असतांना विधान भवनावर आणली असल्याचे ते यावेळी म्हणाले. या बाईक रॅलीत सहभागी होत प्रचंड प्रतिसाद दिल्या बदल त्यांनी यावेळी चंद्रपूरकरांचेही आभार मानले.

  सकाळी 9 वाजता गांधी चौकातुन या रॅलीला सुरवात झाली यावेळी लक्ष्मीनारायण मंदिर येथे रॅलीचे प्रथम स्वागत करण्यात आले. पुढे भद्रावती येथे रवी शिंदे यांनी रॅलीचे स्वागत केले तर वरोरा येथे राहुल जानवे आणि नितीन मत्ते यांनी रॅलीचे स्वागत करत, टेंबुर्डा येथे गावकऱ्यांनी सदर रॅलीचे स्वागत करत आपले समर्थन दर्शविले. रॅली नागपूर येथे पोहचल्या नंतर रॅली पायदळ यशवंत मैदानावर पोहोचली येथे या रॅलीचे रुपांतर सभेत झाले. यावेळी एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री यांना चंद्रपूर जिल्ह्याला 200 युनिट मोफत द्या या मागणीचे निवेदन दिले.  



चंद्रपूर ते नागपूर : आमदारानी पत्नीसह केला दुचाकीने प्रवास

जिह्यातील नागरिकांना घरगुती वापरातील २०० युनिट विज मोफत द्या या मागणीसाठी यंग चांदा ब्रिगेडची अधिकार बाईक रॅली नागपूर विधान भवनावर धडकली. या बाईक रॅलीत हजारो दुचाकींचा समावेश होता. विशेष म्हणजे आमदार किशोर जोरगेवार हे त्यांची पत्नी सौ. कल्याणी यांना बाईकवर पाठीमागे बसवून नागपूर प्रवास केला. यावेळी दोघेही हेल्मेट परिधान केले होते. Kishor Jorgewar

आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः दुचाकी चालवत चंद्रपूर ते नागपूर प्रवास केला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी कल्याणी जोरगेवार सोबत होत्या.स्वतः आमदार किशोर जोरगेवार सपत्नीक दुचाकी चालवत रॅलीत सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. 

   चंद्रपूर जिल्ह्या हा विज उत्पादक जिल्हा आहे. कोळश्यावर आधारीत विज प्रकल्प येथे चालत असल्याने चंद्रपूरकरांना प्रदुषनाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्याच्या मोबदल्या स्वरुप चंद्रपूरकरांना घरगुती वापरातील २०० युनिट विज मोफत देण्यात यावी, शेतीसाठी विज मोफत देण्यात यावी, उद्योग वाढीसाठी उद्योगांना सवलतीच्या दरात विज देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
    याच मागणीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात आयोजित अधिकार बाईक रॅली सुरुवात सकाळी सात वाजता गांधी चौकातुन करण्यात आली. या बाईक रॅलीमध्ये चंद्रपूरसह जिल्हाभरातुन नागरिक सहभागी झाले. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.