Top News

सुप्रसिद्ध लोककलावंत दादा पारधी यांचे दुखःद निधन : झाडीपट्टीत शोककळा dada paradhi zadpatti natyakalavant

चंद्रपूर (प्रतिनिधी) - झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध लोककलावंत , ज्येष्ठ समाजसेवी दादा अंताराम पारधी यांचे काल रात्री ११ वाजता वृद्धापकाळाने...

ads

मंगळवार, डिसेंबर १३, २०२२

Maharashtra police Transfer । पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या; वाचा कोणाला लागली लॉटरी

पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या; वाचा कोणाला लागली लॉटरी विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या  Maharashtra police Transfer व बढतीना मुहूर्त मिळाला.  राज्य सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात मोठा निर्णय घेतला. राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यासंबंधित शासन आदेश जारी करण्यात आला आहे .विश्वास नांगरे पाटील यांना एसीबी आयजीपदी, मिलिंद भारंबे पदोन्नतीवर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, अमिताभ गुप्ता यांच्याकडे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची तर कोकणचे आयजी संजय मोहिते यांच्याकडे लॉ अँड ऑर्डरची जबाबदारी असेल. मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त सदानंद दाते (Sadanand Date) यांची बदली झाली असून ते आता राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक असतील. तसेच बृहन्मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्याकडे आता राज्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश कुमार नवे आयुक्त असतील.   Maharashtra police Transfer

 Maharashtra police Transfer । Maharashtra police Amitabh Gupta vishwas nangre patil । Sadanand Date । Aarti Singh । Eknath Shinde'Maharashtra SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.