Top News

सुप्रसिद्ध लोककलावंत दादा पारधी यांचे दुखःद निधन : झाडीपट्टीत शोककळा dada paradhi zadpatti natyakalavant

चंद्रपूर (प्रतिनिधी) - झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध लोककलावंत , ज्येष्ठ समाजसेवी दादा अंताराम पारधी यांचे काल रात्री ११ वाजता वृद्धापकाळाने...

ads

बुधवार, डिसेंबर २८, २०२२

२ हजार रुपयाची लाच घेताना तलाठ्यास अटक | Latest News on Chandrapur Anti Corruption Bureau

Latest News on Chandrapur Anti Corruption Bureau


चंद्रपूर ।  सातबारा व नकाशा दुरुस्ती करून देण्यासाठी २ हजार रुपयाची लाच घेताना तलाठ्यास अटक करण्यात आली आहे.  Chandrapur Bribe News

Latest News on Chandrapur Anti Corruption Bureau

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे सेवानिवृत्त कर्मचारी व इतर दोघांनी मिळून दिघोरी (पोंभुर्णा) येथे शेत विकत घेतले. त्या सामूहिक शेतजमिनीचे फेरफार करीत वेगळा सातबारा व नकाशा दुरुस्ती करायची होती. मात्र, या कामाकरिता घोसरी येथील तलाठी दिलीप रामचंद्र मोरे याने तीन  हजार रुपयांची मागणी केली.  पैसे दिल्यास काम  तातडीने करून देऊ, अशी हमी तलाठी मोरे यांनी  दिली. तडजोडीअंती 2 हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, यापूर्वी फिर्यादी यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीची पूर्णपणे पडताळणी करीत पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी सापळा रचला. Chandrapur Bribe News Police

पोंभुर्णा येथील भाड्याच्या खोलीत मोरे यांनी २ हजार रुपये स्वीकारले. त्यावेळी लाचलुचपत विभागाच्या चमूने तलाठी मोरे यांना अटक केली. आरोपी तलाठी मोरे यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू आहे. Nagpur | Maharashtra SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.