Top News

विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार | national budget development: Sudhir Mungantiwar

मुंबई, दि. 1 फेब्रुवारी 2023: आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्र...

ads

सोमवार, डिसेंबर १९, २०२२

चंद्रपूरच्या प्रदूषणावर लोकसभेत गाजला मुद्दा Chandrapur pollution news

ताडाळी येथील स्टील प्लांटच्या विस्ताराणाला  परवानगी देऊ नका 

खासदार बाळू धानोरकर यांची लोकसभेत मागणी  


चंद्रपूर :- जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग वाढत असल्याने प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. चंद्रपूर शहर हे राज्यात प्रथम तर देशात दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून नोंद आहे. त्यामुळे ताडाळी येथील स्टील प्लांटच्या प्रदूषणामुळे विस्तारीकरणाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत बोलताना केली. 


chandrapur pollution news | Chandrapur Air Quality Index (AQI) and India Air Pollution | IQAir


संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज ते लोकसभेत बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 5500 मेगावॅट वीज निर्मिती होते. त्यासोबतच सहा सिमेंट प्लांट, दहा स्टील प्लांट, बल्लारपूर पेपर मिल, याशिवाय 48 कोळसा खाणी आहेत. चंद्रपूर शहराजवळील महाऔष्णिक विद्युत केंद्रातून 2920 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. यातील  युनिट नंबर तीन आणि चार 1985 पासून प्रती 210 वीज निर्मिती होते. त्याला ३७ वर्षे झाली असून, कोळशावर वीज निर्मिती करणाऱ्या युनिटची क्षमता २५ वर्षांची असते. असे असतानाही मागील १०-१२ वर्षापासून मर्यादेपेक्षा अधिक काळ वीज निर्मिती केली जात असल्याने प्रदूषण वाढले आहे. हा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. महाराष्ट्र सरकारने ज्याची मर्यादा 2030 वर्षापर्यंत का वाढविली, असा प्रश्न खासदार बाळू धानोरकर यांनी मांडला. चंद्रपूर जिल्हा आधीच प्रदूषणाच्या गरजेच सापडलेला असताना एमआयडीसी ताडाली येथे ग्रेस स्टील प्लांटचा विस्ताराची परवानगी देण्यात येऊ, अशी मागणी देखील खासदार बाळू धानोरकर यांनी केली.


The current PM2. 5 concentration in Chandrapur is 8.1 times above the recommended limit given by the WHO 24 hrs air quality guidelines value.  ChandrapurPollution in Chandrapur has reached an alarming level and it has adversely affected people's health, feel 94.2 % of citizensSHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.