Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

सोमवार, डिसेंबर १९, २०२२

आईच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त शाळेस पोर्टेबल अॅम्पलीफायर भेट Gift of portable amplifier to the school

जुन्नर /आनंद कांबळे

कै. सिताबाई गेणू पारधी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांची कन्या श्रीमती मंदाकिनी गेणू पारधी मॅडम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी (तेजुर)शाळेला पंधरा हजार रुपये किमतीचा एक पोर्टेबल एम्पलीफायर सेट शाळेला भेट देण्यात आला.
या सेट चा उपयोग शाळेच्या विविध कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच कविता गायन, कथाकथन, वकृत्व,पाढे पाठांतर व सहशालेय उपक्रमासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होणार आहे.

शाळेची गरज लक्षात घेऊन त्यांनी बहुमोल सहकार्य केल्याबद्दल शाळेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.


या सेटचे समारंभ पूर्वक उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.जालिंदर दुधवडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आनंदा मांडवे सर उपशिक्षक तानाजी तळपे सर सचिन नांगरे सर लक्ष्मण कुडेकर सर मोहन उंडे सर उपस्थित होते तसेच विद्यार्थी ही आनंदाने सहभागी झाले होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.