Top News

शाळेचे शिक्षक येतात दुपारी दोन वाजता; त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी उचलले असे पाऊल school teacher students Chandrapur

अतिरिक्त शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) येथील जिल्हा परिषद शाळा शिक्षक अवेळी येतात, अध्यापन करत नाही...

ads

सोमवार, डिसेंबर २६, २०२२

गडचिरोली पोलीस दलाने केले एका जहाल नक्षलीस अटक

शासनाने जाहीर केले होते एकुण 02 लाख रुपयांचे बक्षीस
गडचिरोली: दिनांक 25/12/2022 रोजी उपविभाग भामरागड मधील पोमकें धोडराज हद्दीतील मौजा नेलगुंडा या गावात जहाल नक्षली नामे वत्ते ऊर्फ प्रदीप वंजा वड्डे, वय 40 वर्षे, रा. गुंडा तह. भामरागड जि. गडचिरोली हा त्याच्या स्वतःच्या गावात लपून बसलेला आहे. या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाचे जवान अभियान करीता असतांना त्याला ताब्यात घेतले. गडचिरोली जिल्हामध्ये नक्षलवादी नेहमीच शासकिय मालमत्तेचे नुकसान करीत असतात तसेच पोलीस दलाचे नुकसान अथवा घातपात करण्याच्या उद्देशाने योजना आखत असतात. मिळालेल्या माहितीवरुन हा जहाल नक्षलवादी काही विघातक कृत्य करण्याच्या उद्देशाने गावामध्ये लपून बसलेला होता. त्याच्या विघातक कृत्यांना वेळीच आळा घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळाले आहे. अटक करण्यात आलेला नक्षलवादी नामे - वत्ते ऊर्फ प्रदीप वंजा वड्डे, वय 40 वर्षे, रा. नेलगुंडा, तह. भामरागड, जि. गडचिरोली येथील असुन, 1997 साली तो नक्षलमध्ये भरती होवुन, सध्या भामरागड दलममध्ये सदस्य या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर 03 पोलीस खुनासहीत 8 खुन, 3 चकमक, 1 दरोडा व इतर 1 असे एकुण 13 गुन्हे दाखल आहेत. अशा अनेक गुन्हामध्ये त्याचा सहभाग असून, सदर नक्षलवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने अटक केलेली असून, पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने 02 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे माहे- जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 60 नक्षलवाद्यांना अटक, 08 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण व 03 नक्षलवाद्यांचा पोलीस-नक्षल चकमकीमध्ये मृत्यु झाला.

66 सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.