वर्धा नदीवरील धानोरा - वढा येथे नदीच्या मध्यभागी इंटेक वेल निर्माण यांच्या माध्यमातून नदी पात्रातून शेतकऱ्यांच्या वाटयाला जाणारे पाणी कंपनी हिसकावून घेत आहे तसेच हा पाणी ज्याठिकाणी संचय केल्या जात आहे त्या त्याठिकाणी कंपनी तर्फे फ्लाय ऍशचा ही साठा केल्या जातो या परिसरातील शेतात संचित जलसाठ्यातुन बारो महिने पाणी झिरपत असल्याने व धुळीने परिसरातील शेतकऱ्यांचे संपूर्ण शेतच उध्वस्त झाले आहे.
आज सकाळी साडे नऊ वाजता क्षेत्रातील खासदार बाळू धानोरकर यांने तहसीलदार निलेश गौड, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी,धारीवाल कंपनीचे यांच्यासह वढा येथील पाणी पंपाची पाहणी केली व प्रदूषणग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीला भेट दिली येथून धारीवाल कंपनीत शेतकऱ्यां सह धडक देऊन कंपनी अधिकारी गांगुली व मुखर्जी यांची कानउघाडणी केली. शेतकऱ्यांना तातळीने नुकसानभरपाई करीता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावण्यात आली होती.
यावेळी खासदार धानोरकर म्हणाले की, मागील तीन दिवसापासून सातत्याने धारिवालच्या या संपूर्ण कामाची चौकशी पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून होत आहे. धारिवाल कंपनी सर्रास लोकांची दिशाभूल करत आहे,
सोनेगांव येथील धारिवाल कंपनीचा रिजर्व वायरमुळे २६ हुन अधिक शेतकऱ्याच्या जवळपास २०० च्या वर परिसरातील शेतीमध्ये दलदल झाली आहे. यामुळे जमीन शेतीयोग्य राहीली नाही. त्यासोबतच वढा येथे असलेल्या रेडीयल वेल मध्ये ८ पम्प च्या साहाय्याने पाण्याची उचल करण्यात येते. त्याकरिता चक्क धारिवाल कंपनीने पाण्याच्या प्रवाहच बदल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. रेडीयल वेल ते कंपनी पर्यंत पाणी पोहचविण्याकरिता १६ किमी पाईपलाईन टाकण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यासर्व विषयाला घेऊन खासदार बाळू धानोरकर यांनी आज प्रत्यक्ष भेट दिली. हि बाब अतिशय गंभीर आहे. आज कंपनी बंद करण्याची घोषणा खासदार बाळू धानोरकर यांनी दिली होती. परंतु जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या विनंती नंतर हे आंदोलन तुरतास मागे घेण्यात आले असून २१ डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी कंपनी व्यवस्थापकाला यावेळी दिले.
धारीवाल उद्योग समुहाच्या अॅश पाँडमधून निघणा-या राखेमुळे नदी व नाल्यामध्ये जाऊन पाणी प्रदुषीत होत आहे. यामुळे जनावरांचे आरोग्यास देखील धोका निर्माण झाला आहे. धारीवालच्या वढा स्थित पंप हाऊसमधून निघणारी पाईप लाईन वारंवार लिकेज होत असल्यामूळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी देखील फार नुकसान होत आहे. विनापरवानगी व विना मोजनी कंपनीने पाईप लाईन टाकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
#dhariwal #khabarbat #india #chandrapur #live
Watch video on YouTube here: https://youtu.be/NI9JID2TivY
Watch video on YouTube here: https://youtu.be/NI9JID2TivY