Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

मंगळवार, डिसेंबर २०, २०२२

माणुसकी सोबत रक्ताचे नाते जोपासा; गोविल मेहरकुरे

माणुसकी सोबत रक्ताचे नाते जोपासा; गोविल मेहरकुरे

विदर्भ तेली समाज महासंघाचे चंद्रपूर तालुका अध्यक्ष गोविल मेहरकुरेचंद्रपूर : आजच्या काळात माणूस माणसापासून दूर जात आहे. समाज विरूखला जात आहे. भविष्यात सामाजिक प्रगती करायची असेल तर माणुसकी सोबत रक्ताचे नाते जोपासावे, असे आवाहन विदर्भ तेली समाज महासंघाचे चंद्रपूर तालुका अध्यक्ष गोविल मेहरकुरे यांनी केले.

जटपुरा येथील हनुमान मंदिर येथे आरोग्य व रक्तदान शिबिराचे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजिन केले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी गोवील मेहरकुरे यांनी स्वतः रक्तदान करीत रक्तदान चळवळ सर्व समाजाने पुढे न्यावी असे आवाहन केले

यावेळी माजी नगरसेवक आकाश साखरकर, नितेश जुमडे, निलेश बेलखेडे, शैलेश जुमडे, जितू इटनकर, राजेश पोटदुखे, विकास घटे, आनंद जुमडे, प्रमोद हजारे, रवी जुमडे, अमित वैरागडे, हरिभाऊ नागपुरे, राकेश घटे, श्रुती घटे, चंदाताई इटनकर, मीनाक्षी गुजरकर, संगीता कुळझेकर, लुमिता नागपुरे, सरिता घटे यांची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.