देशासह राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोविड रुग्णसंखेत वाढ होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात करून नियंत्रणात आणण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे. ही टास्क फोर्स राज्यातल्या कोरोना स्थितीबद्दल सरकारला सूचना देत राहील. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान, पुन्हा निर्बंध, पुन्हा मास्क, पुन्हा लॉकडाऊन का? असा प्रश्न जनतेसमोर उपस्थित झाला आहे.
टास्क फोर्स राज्यातल्या कोरोना परिस्थितीबाबत सरकारला सूचना करणार आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता पुन्हा निर्बंध लागणार, पुन्हा मास्क लावावा लागणार का, असा प्रश्न जनतेसमोर आहे.तर चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही सतर्क झालं आहे
आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्ण संख्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 2 नोव्हेंबर रोजी जगभरात 3.3 लाख कोविड रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली होती. त्यानंतर या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत गेली. हा आकडा डिसेंबर 18 नंतर 5.1 लाखांवर पोहोचला आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालेले आहे. सरकारकडून सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवण्यात आले आहे. दरम्यान, आज केंद्रीय स्तरावर याबाबत बैठक होणार असून, निर्बंध बद्दलची माहिती त्यानंतर समोर येऊ शकते.