Top News

नव्या वर्षातील जानेवारी महिना निघाला संपूर्ण प्रदूषित Chandrapur Air Quality Index (AQI) and India Air Pollution

नवं वर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक 31पैकी 31 दिवस   प्रदूषण  आढळले हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ...

ads

शुक्रवार, डिसेंबर ३०, २०२२

चंद्रपूर जिल्ह्यात कोळशावर आधारित उद्योगाला मंजुरी; 20 हजार कोटींची गुंतवणूक | Coal In Chandrapurचंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे कोळसा खनिजावर आधारित हायड्रोजन, मिथेनॉल, अमोनिया युरिया निर्मितीचा वीस हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे दहा हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील दोन खाणींमध्ये सोने असल्याचेही केंद्राच्या खनीकर्म मंत्रालयाला अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच विदर्भाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.  Chief Minister Eknath Shinde.
त्यांनी सांगितले की खनिज साठ्यांची ई लिलाव एकूण 28 खान पट्ट्यांचा यशस्वी लिलाव झालेला आहे. विदर्भातील खनिज संपत्तीचे योग्य तो उपयोग राज्याच्या विकासासाठी व्हावा, यासाठी राज्याची नवीन खनिज धोरण घोषित करण्यात येईल. त्यामुळे विदर्भातील खनिक्रम उद्योग व्यवसायिकांना अधिक गती मिळेल. 

यावेळी त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील 70 टक्के खनिज संपत्ती एकट्या विदर्भात आहे. विशेषता गडचिरोली जिल्ह्यामध्ये उच्च दर्जाच्या लोह खनिजाचा साठा आहे. सुरजागड येथे 14 हजार कोटी रुपये व पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे दोन नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. 

या प्रकल्पाव्यतिरिक्त आणखी एक पंधराशे कोटी रुपये एवढी गुंतवणूक असलेला स्टील प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात येणार आहे. या तीन प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. प्रकल्प सुरू करणे हे शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे त्यात कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच जशास तसे उत्तर देऊ. नक्षलवाद मोडून काढू. त्या भागातील नागरिकांच्या हाताला काम देऊ. त्यासाठी केंद्राचे ही सहकार्य मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

An investment project of 20 thousand crore rupees has been approved for the production of hydrogen, methanol, ammonia urea based on coal ore at Bhadravati in Chandrapur district. Therefore, about ten thousand people will get direct and indirect employment in Chandrapur district, a report has also been sent to the Union Ministry of Mines that there is gold in two mines of Chandrapur district. Therefore, Vidarbha will soon have its golden days, asserted Chief Minister Eknath Shinde.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.