Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

सोमवार, डिसेंबर १९, २०२२

मालमत्ता व पाणी करात ५% सुट; अवघे काही दिवस शिल्लक CMC Property Tax bill Search

मालमत्ता व पाणी करात सुट मिळण्यास अवघे काही दिवस शिल्लक

३१पर्यंत लाभ घेण्याचे मनपाचे आवाहन



चंद्रपूर १८ डिसेंबर - चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुली सुरु असून कर भरणा करतांना नागरीकांना लाभ व्हावा या दृष्टीने ३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता  व पाणी करात ५% सुट देण्यात येणार आहे. परंतु सदर सुट ही औद्योगीक मालमत्तेस लागु राहणार नाही.   
 
     यापुर्वी सन २०२२-२३ मध्ये ज्या नागरीकांनी एकमुस्त चालु आर्थिक वर्षाचा मालमत्ता व इतर कराचा भरणा केला असल्यास अशा मालमत्ता धारकांनाही सुट देण्यात येईल, मात्र सदर सुटची रक्कम पुढील आर्थिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये समायोजीत करण्यात येणार आहे.  
       शहरातील मालमत्ता धारकांनी थकीत कराचा भरणा करावा यासाठी महानगरपालिकेमार्फत सूट देण्यात असुन याअंतर्गत एकमुस्त भरणा केल्यास  ०१/१२/२०२२ ते ३१/१२/२०२२ पर्यंत कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ % सुट देण्यात येणार आहे.

    एकुण मालमत्ता करत सदर सुट देण्यात येत असल्याने मालमत्ता कर त्वरित भरण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

कराचा भरणा झोन कार्यालये तसेच https://www.cmcchandrapur.com या वेबसाईटवर ऑनलाईन सुद्धा करता येत आहे. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.