Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

शुक्रवार, डिसेंबर ३०, २०२२

चंद्रपूर दीक्षाभूमीबाबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा | Chief Minister | Chandrapur Dikshabhoomi

चंद्रपूरच्या दिक्षाभूमीचा विकास होणार...
चंद्रपूर दीक्षाभूमीबाबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा | Chief Minister | Chandrapur Dikshabhoomi
Chandrapur Dikshabhoomi


आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मागणीच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची विधानसभेत घोषणा...


संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर नंतर चंद्रपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धम्माचे दीक्षा दिली तेव्हापासून हे स्थळ पवित्र दीक्षाभूमी म्हणून मानले जाते. त्या ठिकाणी दीक्षाभूमी ची निर्मिती देखील करण्यात येत आहे. या भागाचा विकास व्हावा यासाठी आवश्यक निधी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
Chief Minister | Chandrapur Dikshabhoomi

दीक्षाभूमी हे चंद्रपूर शहरातील आणि नागपूरच्या दीक्षाभूमीखालोखाल भारतातील बौद्ध धर्मीयांचे प्रमुख बौद्ध तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी आपल्या ३ लाखापेक्षा अधिक अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. तत्पूर्वी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे १४ व १५ ऑक्टोबर १९५६ रोजी अनुक्रमे ५ लाख व २ लाख अशा एकूण ७ लाखावर अनुयायांनाही दीक्षा दिली होती. त्यामुळे या दोन्ही स्थळांना ‘दीक्षाभूमी’ म्हटले जाते.

Chief Minister | Chandrapur Dikshabhoomi
बाबासाहेबांनी चंद्रपूरला ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी त्यांच्या नावाचे 'डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय' सुरू आहे. आणि या दीक्षाभूमीवर एक विशाल स्तूप उभारला जात आहे. वर्षभर बौद्ध अनुयायी येथे भेटी देत असतात, परंतु दरवर्षातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाला म्हणजेच १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी १० लाखापेक्षा अधिक बौद्ध लोक येथे बुद्धाला व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा होऊन हा दिवस उत्साहात साजरा करतात.
Chief Minister | Chandrapur Dikshabhoomi | Kishor Jorgewar

आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मागणीच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी चंद्रपूर येथील दिक्षाभूमीचा विकास करण्याची घोषणा केली आहे. त्याबद्दल मा. मुख्यमंत्री साहेब यांचे आभार मानले.SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.