Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

शुक्रवार, डिसेंबर १६, २०२२

असं काय आहे या लग्नपत्रिकेत? ज्याची चंद्रपुरात सुरू आहे चर्चा! Chandrapur historical heritage marriage card

असं काय आहे या लग्नपत्रिकेत? ज्याची चंद्रपुरात सुरू आहे चर्चा! Chandrapur historical heritage marriage card
असं काय आहे या लग्नपत्रिकेत? ज्याची चंद्रपुरात सुरू आहे चर्चा!
Chandrapur historical heritage marriage card

लग्नपत्रिका म्हटले की महागडे कार्ड आणि आकर्षक डिझाईनची मागणी असते. प्रत्येक जण आपली लग्नपत्रिका आगळीवेगळी करण्याचा प्रयत्न करीत असतो. असेच एक लग्नपत्रिका सध्या चंद्रपूर शहरात समाज माध्यमातून वायरल झाली असून, त्याची चर्चा आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश देणारी ही लग्नपत्रिका आगळीवेगळी असली तरी लग्न सोहळ्यात चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक वैभव सांगणारी प्रतिकृती देखील आकर्षक ठरणार आहे. सुनील मिलाल असे या नवरदेवाचे नाव असून, त्याचा विवाह सोहळा 17 डिसेंबर रोजी होत आहे. Historical chandrapur, wedding card,   chandrapur

लग्न पत्रिकेतून दिला ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश

सुनील हा इको प्रो पर्यावरण प्रेमी संस्थेचा कार्यकर्ता असून, त्याने चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. यातूनच मिळालेल्या प्रेरणेतून त्याने आपल्या लग्न पत्रिकेत चंद्रपूर शहरातील सर्व ऐतिहासिक वर्षांचे जतन व्हावे, यासाठी पत्रिकेमध्ये शहरातील सर्व ऐतिहासिक स्थळांचे छायाचित्र आणि जनजागृती करणारी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या लग्न सोहळ्यात स्वागतासाठी चंद्रपूरच्या गोंडकालीन वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या परकोटाची कोरलेली प्रतिकृती राहणार आहे.

Wedding Card |  Best Wedding Invitations in Chandrapur  | Chandrapur map
Mahakali temple Chandrapur history | चंद्रपुरातील ऐतिहासिक वारसा विषयी जनजागृती
लोकपूर, इंदुपूर या गावापासून चांदा ते चंद्रपूर शहराच्या प्रवासात ऐतिहासिक वारसा निर्माण झाला. पुढे ब्रिटिश राजवट आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर तो जतन व्हावा, यासाठी प्रयत्न झाले. आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सहकार्य करण्याची गरज आहे. चंद्रपूर शहरांमध्ये प्राचीन आणि गोंडकालीन काळातील अनेक वास्तू आजही आहेत. त्या जिवंत राहिल्या पाहिजेत, यासाठी आपला वारसा आपणच जपूया ही संकल्पना शहरातील सर्व नागरिकांमध्ये रुजवण्याची आज गरज आहे. हा संदेश नातेवाईकांच्या आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून पोहोचण्याच्या दृष्टीने पत्रिकेच्या रूपाने जनजागृती करण्याचा हा प्रयत्न अनोखा आहे. Historical chandrapur, wedding card,   chandrapur

*ऐतिहासिक वास्तु संवर्धनाचा संदेश*
"आपला वारसा, आपणच जपुया"

ऐतिहासिक वारसा देशाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांना घाण करू नका. स्मारकांना नुकसान होण्यापासून प्रतिबंधित करा, ते सर्वात मौल्यवान वास्तु आहेत. आपल्या शहरातील ऐतिहासिक स्मारके आणि स्थळ आपल्या पूर्ण शक्तीने जतन करा. ऐतिहासिक वास्तु-वारसा ही राष्ट्राची शान आणि सामर्थ्य असते, असे आवाहन या माध्यमातून होत आहे. Historical chandrapur, wedding card,   chandrapur

The famous dynasties that have ruled the area are the Gonds and later Marathas. The city was established by Gond King Khandakya BallalShah in the 13th century at the behest of his queen who believed the area would prove to be a strong point of fortification.

Sunil is an activist of Eco Pro Environment Lovers organization and participated in Chandrapur Fort Cleanliness Mission. From this inspiration, he has given photographs of all the historical places of the city and awareness information in his wedding pamphlet, so that all the historical years of Chandrapur city can be preserved. Interestingly, there will be a carved replica of the Perkota, which depicts Chandrapur's Gond-era glory, for reception at the wedding ceremony to be held on December 17.

सुनील ईको प्रो संस्था का कार्यकर्ता है और उसने चंद्रपुर किला सफाई अभियान में भाग लिया था। इसी प्रेरणा से उन्होंने अपने विवाह पैम्फलेट में शहर के सभी ऐतिहासिक स्थलों के फोटोग्राफ और जागरूकता की जानकारी दी है, ताकि चंद्रपुर शहर के सभी ऐतिहासिक वर्षों को सहेजा जा सके। दिलचस्प बात यह है कि 17 दिसंबर को होने वाले विवाह समारोह में रिसेप्शन के लिए पेरकोटा की एक नक्काशीदार प्रतिकृति होगी, जो चंद्रपुर के गोंड-युग की महिमा को दर्शाती है।लोक हेदेखील ‍व‍िचारतातSHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.