Top News

नव्या वर्षातील जानेवारी महिना निघाला संपूर्ण प्रदूषित Chandrapur Air Quality Index (AQI) and India Air Pollution

नवं वर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक 31पैकी 31 दिवस   प्रदूषण  आढळले हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ...

ads

मंगळवार, डिसेंबर १३, २०२२

प्रेयसीच्या वडिलाचा चक्क गळाच चिरला । Chandrapur Breaking local Crime

चंद्रपूर । प्रेमात क्रोधाने जागा घेतली की माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. मृतकाची मुलगी आरोपींवर प्रेम करत होती. मात्र, तिचा बाप प्रेमात अडसर येत होता. आरोपीने प्रेयसीच्या वडीलाचाच काटा काढीत चक्क गळाच चिरून टाकला. ही हत्या करण्यापूर्वी आरोपींनी मृतकाला घरातून प्रेमाने बोलावून नेले. व तिथेच बाचाबाची झाल्यानंतर आरोपीने हत्या केल्याची चर्चा आहे.


चंद्रपूरजवळील दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या (durgapur police station) हाकेच्या अंतरावर गळा चिरून हत्या केल्याने शहरात दहशत निर्माण झाली आहे.


दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या अगदी २०० मिटर अंतरावर असलेल्या ग्राम पंचायत उर्जानगर urjanagar भवनात आरोपी प्रथम वाढई (Prathamesh wadhai) वय २१ वर्ष याने विकास गणविर (वय ४७ वर्ष) यांचा धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. विशेष म्हणजे घटनेच्या एक दिवसांपूर्वी आरोपींनी मृतकाच्या घरी कुऱ्हाड घेऊन मारण्यासाठी गेला होता. मात्र वेळीच पोलीसांनी आरोपीच्या हातातून कुऱ्हाड घेऊन प्रकरण शांत केले. मात्र आरोपींची मनातील क्रोध शांत झाला नव्हता. त्यामुळे आज त्याचा वचपा काढल्याची चर्चा आहे.

दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्निल धुळे अधिक तपास करीत आहेत. 
SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.