Top News

नव्या वर्षातील जानेवारी महिना निघाला संपूर्ण प्रदूषित Chandrapur Air Quality Index (AQI) and India Air Pollution

नवं वर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक 31पैकी 31 दिवस   प्रदूषण  आढळले हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ...

ads

गुरुवार, डिसेंबर २९, २०२२

देशी कट्टासह दोन जिवंत काडतुसे जप्त ; दोघांना अटक | Deshi katta



*वरोरा येथील रत्नमाला चौकातील घटना

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
वरोरा : एका वाहनातून देशी बनावट कट्टा (Deshi banavati katta) घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांना मिळाली असता पोलिसांनी वरोरा येथील रत्नमाला चौकात नाकाबंदी करून त्या वाहनातून एक देशी बनावट पिस्तूल दोन जिवंत काडतुसे सह दोघांना अटक केली,सदर घटना दि.२८/१२/२०२२रोजी रात्री ११ते१२च्या दरम्यान घडली.
पुनंमचंद् येलय्या मारकरी(३४ वर्ष) अभिलाष ओदेलू पंचल(३०वर्ष)दोघेही रा, माजरीचे रहिवाशी आहेत.
उपविभागीय पोलीस कार्यालयाला गोपनीय माहिती मिळाली की वरील दोन आरोपी देशी बनावट पिस्टल घेऊन बलेनो गाडी वाहन क्रमांक MH BR ८५९३ या चारचाकी वाहनाने वरोऱ्याकडे येत आहेत, उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी कुठलाही विलंब न करता स्थानिक रत्नमाला चौकात पोलीस नाकेबंदी करून सदर वाहनाला थांबवले व त्या वाहनातून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली, दोन आरोपींना अटक करून दोन्ही आरोपी कडून ५ लाख २६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात सपोनि राजकीरण मडावी, पोलीस स्टेशनचे जुमडे, गुरनुले, अनिल बैठा, शिंदे, प्रविण निकोडे यांनी केली.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.