Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र दिनांक 09.02.2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.02.2023 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र Marathi News Nagpur - All India Radio   @marath...

ads

गुरुवार, डिसेंबर २९, २०२२

या फक्त एका कारणामुळे बंद होते चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मागील गेट | Back Gate of Government Medical College, Chandrapur

चंद्रपूर शहराबाहेर जाण्याकरीता एक तसेच शहरात येण्याकरीता एक रस्ता असल्यामुळे ट्रफिक कायम जाम होत असते. त्यामुळे रुग्णवाहिका अडकून पडतात. हा नाहक त्रास दूर करण्यासाठी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागील गेट सुरु करण्याची सुरु करा, असे पत्र खासदार बाळू धानोरकर यांनी अधिष्ठाताना दिले आहे.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागील बाजूचे गेट 

रुग्णवाहिकासाठी सुरु करा
खासदार बाळू धानोरकर यांचे अधिष्ठाताना पत्र


चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागील बाजूचे गेट त्या बाजुला राहण्याऱ्या क्वॉटर्सला डिस्टर्ब होत असल्यामुळे बंद करण्यात आले होते. चंद्रपूर शहरात दोन मुख्य रस्ते असल्यामुळे सणासुदीला मेन रोडवर गर्दी असते. त्यामुळे पेशन्टला उपचाराकरीता नेण्यासाठी रस्त्यावर फार अडचणी येतात. तसेच एकच गेट असल्यामुळे पेशन्ट तसेच रुग्णवाहिकेला लांब फिरुन रुग्णालयात यावे लागते. जटपुरा गेट परिसरात नेहमी ट्रफिकमुळे रहदारीकरीता अडचणी येत असतात. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागील बाजूचे गेट सार्वजनिक उपयोगाकरीता तात्काळ सुरु करण्याची सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिली आहे.पेज नेव्हिगेशन
SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.