Top News

नव्या वर्षातील जानेवारी महिना निघाला संपूर्ण प्रदूषित Chandrapur Air Quality Index (AQI) and India Air Pollution

नवं वर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक 31पैकी 31 दिवस   प्रदूषण  आढळले हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ...

ads

रविवार, डिसेंबर ११, २०२२

75,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी |

 


Posted On: 11 DEC 2022 2:43PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील, 75000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. यात, 1500 कोटी रुपयांचे राष्ट्रीय रेल्वे प्रकल्प, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ (NIO), नागपूर, नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. याच कार्यक्रमात, पंतप्रधानांनी, केंद्रीय पेट्रोकेमिकल्स इंजिनियरिंग आणि तंत्रज्ञान संस्था (CIPET) चंद्रपूरचेही राष्ट्रार्पण केले आणि हिमोग्लोबिनोपॅथीशी संबंधित आनुवंशिक आजारांवर संशोधन व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्राचेही त्यांनी उद्घाटन केले.

त्याआधी, पंतप्रधानांनी, नागपूर-बिलासपूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला. तसेच नागपूर मेट्रोच्या पहिल्या (फेज-I) टप्प्याचे राष्ट्रार्पण केले आणि ‘नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची (फेज –II)पायाभरणी केली. तसेच, हिंदूहृदयसम्राट, बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचेही त्यांनी उद्घाटन केले. 520 किलोमीटरचा हा नागपूर ते शिर्डी असा महामार्ग आहे.

तसेच, 1575 कोटी रुपये खर्चून विकसित केल्या गेलेल्या, एम्स नागपूरचेही पंतप्रधानांनी लोकार्पण केले. या एम्समध्ये सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधा आहेत, ज्यात बाह्य रुग्ण विभाग, अंतर्गत रूग्ण विभाग- IPD, आजार निदान सेवा, शस्त्रक्रिया विभाग यासह 38 विभाग आहेत, ज्यात सर्व स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध असतील. या रुग्णालयात, अत्याधुनिक आरोग्य सेवा, विदर्भाच्या जनतेसाठी उपलब्ध असतीलच, विशेषतः गडचिरोली, गोंदिया आणि मेळघाट सारख्या आदिवासी बहुल भागांसाठी ह्या आरोग्यसेवा वरदान ठरतील.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पंतप्रधानांनी सर्वांना आजच्या संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आणि श्री गणेशाला वंदन केले. आजचा दिवस अत्यंत विशेष दिवस आहे, कारण नागपूर भागासाठी, विकासकार्यांचा एक तारकासमूह- महानक्षत्र उदयाला येत असून, यामुळे नागपूर आणि महाराष्ट्रातील लोकांचे जीवनमान बदलून जाणार आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

“आज, महाराष्ट्राच्या विकासासाठीच्या अकरा ताऱ्यांचे एक महानक्षत्र उदयाला येत आहे. ज्यामुळे, महाराष्ट्राला विकासाची नवी उंची गाठता येणार असून, विकासाची नवी दिशाही मिळणार आहे.” असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी, सर्व 11 प्रकल्पांची यादी सांगतांना, ते पुढे म्हणाले, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा, नागपूर ते शिर्डीपर्यंतचा टप्पा आता तयार झाला आहे, एम्समुळे विदर्भातील लोकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणार आहेत, राष्ट्रीय राष्ट्रीय वन हेल्थ संस्थेच्या प्रस्तावित इमारतीची आणि सीआयपीटी चंद्रपूरची पायाभरणी तसेच नाग नदीतील प्रदूषण निर्मूलनासाठीचे प्रकल्प, मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आणि दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी, नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात, नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे प्रकल्प, अजनी इथल्या 42 हजार अश्वशक्तीच्या रेल्वे इंजिनांच्या व्यवस्थापन डेपोचे उद्घाटन, तसेच नागपूर इटारसी रेल्वेमार्गाच्या कोहली-नरखेड टप्प्याचे उद्घाटन” अशा प्रकल्पाचा समावेश आहे. यास सर्व पूर्ण झालेल्या किंवा भविष्यात होऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले.

हे सगळे प्रकल्प म्हणजे, केंद्र आणि राज्यातील दुहेरी इंजिनाच्या सरकारांच्या कार्याच्या गतीचा पुरावाच आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. समृद्धी महामार्गामुळे केवळ नागपूर आणि मुंबई दरम्यानचे अंतरच कमी होणार नाही, तर, हा प्रकल्प महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांना दळणवळणाच्या अत्याधुनिक सेवांनी जोडणार आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यामुळे रोजगाराला तर चालना मिळेलंच, त्याशिवाय, या प्रकल्पाचा लाभ, शेतकरी, भाविक यात्रेकरू आणि उद्योगक्षेत्रालाही होईल, असेही ते पुढे म्हणाले.

या प्रकल्पांच्या अतिशय सखोल अशा नियोजनावर प्रकाश टाकतांना पंतप्रधान म्हणाले, की आज उद्घाटन झालेल्या या प्रकल्पातून, पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासामागील, सरकारचा सर्वांगीण दृष्टिकोन स्पष्ट होतो. “ नागपूर एम्स असो किंवा मग, समृद्धी महामार्ग असो, वंदे भारत ट्रेन असो, किंवा मग नागपूर मेट्रो असो, हे सगळे प्रकल्प जरी वेगवेगळ्या सुविधा देणारे असले, तरीही जेव्हा हे सगळे एका पुष्पगुच्छासारखे आपण एकत्रित बघतो, तेव्हा, त्यामागे असलेला सर्वांगीण विकासाचा अर्थ, नागरिकांपर्यंत नक्कीच पोहोचतो.” असे मोदी म्हणाले.

दुहेरी- इंजिन सरकारच्या प्रयत्नांकडे लक्ष वेधत पंतप्रधान म्हणाले की, सर्वसामान्य माणसासाठी आरोग्यसेवा असो की संपत्ती निर्माण असो, शेतकरी सक्षमीकरण असो किंवा जलसंधारण असो, अशा सर्व पायाभूत सेवा सुविधांना आमच्या सरकारने मानवी स्वरूप दिले आहे. पायाभूत सुविधांना पहिल्यांदाच मिळालेला हा मानवी स्पर्श प्रत्येकाच्या आयुष्यात बदल घडवत आहे.

Inauguration and foundation laying of various projects worth Rs.75,000 crore

पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत अंगिकारलेल्या सर्वांगीण दृष्टीकोनाची उदाहरणे देताना पंतप्रधान म्हणाले, “प्रत्येक गरिबाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देणारी आयुष्मान भारत योजना हे आपल्या सामाजिक पायाभूत सुविधांचे उदाहरण आहे, काशी,केदारनाथ, उज्जैन ते पंढरपूर पर्यंत आपल्या श्रद्धास्थानांचा विकास हे आपल्या सांस्कृतिक पायाभूत सुविधांचे उदाहरण आहे, ४५ कोटींहून जास्त गरीब लोकांना बँकिंग व्यवस्थेशी थेट जोडणारी जन धन योजना, हे आपल्या आर्थिक पायाभूत सुविधांचे उदाहरण आहे.”


Inauguration and foundation laying of various projects worth Rs.75,000 crore


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.