Top News

नव्या वर्षातील जानेवारी महिना निघाला संपूर्ण प्रदूषित Chandrapur Air Quality Index (AQI) and India Air Pollution

नवं वर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक 31पैकी 31 दिवस   प्रदूषण  आढळले हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ...

ads

गुरुवार, डिसेंबर १५, २०२२

चंद्रपुरात ६८ वे विदर्भ साहित्य संमेलन; अशी केली तयारी | Vidarbha Sahitya Sangha

चंद्रपुरात ६८ वे विदर्भ साहित्य संमेलन
आजपासून चंद्रपूरात १६, १७ आणि १८ डिसेंबरला ६८ वे विदर्भ साहित्य संमेलन

सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचचा पुढाकार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सहकार्य, तीन दिवस चालणार साहित्यजागर

चंद्रपूर‌ - विदर्भ साहित्य संघ नागपूरच्या शताब्दी वर्षानिमित्ताने चंद्रपूरात ६८ वे विदर्भ साहित्य
संमेलन घेण्यासाठी चंद्रपूरातील शहरातल्या सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच या साहित्यक्षेत्रातल्या प्रसिद्ध संस्थेने पुढाकार घेतला असून अग्रणी शिक्षणसंस्था सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूरच्या सहकार्याने हे संमेलन दि. १६,१७ आणि १८ डिसेंबर २०२२ ला प्रख्यात विचारवंत आणि लेखक डॉ. वि. स. जोग यांचे अध्यक्षतेत स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात होणार आहे. संमेलनाचे मुख्य संयोजक माजी कुलगुरु डॉ. किर्तीवर्धन दिक्षित यांनी ही माहीती दिली.

     शताब्दी वर्षानिमित्ताने विदर्भ साहित्य संमेलन चंद्रपूरात व्हावे हे शहरातल्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी सरत्या वर्षाला आनंद देणारी कृतीशिलता ठरेल यात दुमत नाही.

     शुक्रवार दि. १६ डिसेंबर ला सकाळी ८ वाजता सरदार पटेल महाविद्यालयाच्या संयोजनात आजाद बगीचा येथून ग्रंथदिंडी निघेल आणि संमेलनस्थळी पोहचेल. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार करतील. यावेळी ६७ वे विदर्भ साहित्य संमेलनाचे
पुर्वाध्यक्ष डॉ. म.रा. जोशी, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. फिरदौस मिर्जा प्रामुख्याने उपस्थित राहतील.

दुपारी २ वाजता कथाकथन होणार असून विदर्भातील नामवंत कथालेखक यात सहभाग घेतील.

दुपारी ४ वाजता साहित्य व अवांतर वाचनापासून मराठी वाचक दुरावला आहे का? या विषयावर अनिल बोरगमवार यांचे अध्यक्षतेत चर्चासत्र होणार असून सायंकाळी ६ वाजता झाडीबोली आणि झाडीपटटीतील नाटकांचा सहसंबंध या विषयावर डॉ. राजन जयस्वाल यांचे अध्यक्षतेत व प्रकाश पाटील पोरेडडीवार यांचे प्रमुख उपस्थितीत चर्चासत्र होईल.

   रात्री ८ वाजता विदर्भातल्या नामवंत कवींचे कविसंमेलन डॉ. मिर्जा रफी बेग यांचे अध्यक्षतेत संपन्न होणार असून नितिन नायगावकर संचालन करतील.

      शनिवार दि. १७ डिसेंबर २०२२ ला सकाळी ८ वाजता कवितेचा काठावर हा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयातील नोंदणी केलेल्या निवडक तीस कविंचे कविसंमेलन होणार असून संयोजन व संचलन स्वप्नील मेश्राम करतील.

       दुपारी ११ वाजता आमचे गाव - आमचे सरकार या चळवळीचे प्रणेते देवाजी तोफा आणि आम्ही आमच्या आरोग्यासाठी चळवळीचे प्रमुख डॉ. सतीश गोगुलवार यांचे अनुभव कथन होईल. दुपारी १ वाजता इतिहासातल्या पानातला विदर्भ आणि साहित्य या विषयावर तिसरे चर्चासत्र प्रख्यात इतिहास संशोधक अशोकसिंग ठाकुर यांचे अध्यक्षतेत होईल.

      दुपारी ३ वाजता गजल मुशायरा होणार असून अध्यक्षस्थानी शिवाजी जवरे राहतील तर संचलन अनंत नांदूरकर करतील. यात विदर्भातील नितीन देशमख, गोपाल मापारी, अजीज पठाण, अल्पना देशमुख यांचेसह निवडक गजलकार सहभाग घेतील.

          सायंकाळी ५ वाजता चवथे चर्चासत्र वैदर्भीय साहित्याच्या अभिवृद्धीमध्ये समाजमाध्यमांची भूमिका
यावर ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजीत यांचे अध्यक्षतेत संपन्न होईल.

सांयकाळी ७ वाजता निमंत्रितांचे दुसरे कविसंमेलन ना. गो. थुटे यांचे अध्यक्षतेखाली होणार असून नरेशकुमार बोरीकर संचालन करणार असून यात जवळपास विदर्भातील कवी सहभागी होतील.

रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन असेल.

रविवार दि. १८ डिसेंबरला सकाळी १० वाजता चंद्रपूर गडचिरोली जिल्हयातील वन्यजीव, पाणी आणि पर्यावरण या विषयावर पाचवे चर्चासत्र ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांचे अध्यक्षतेत होणार असून यात संजय वैद्य, डॉ. योगेश्वर दुधपचारे व निखिल तांबेकर यांचेसह मान्यवर अभ्यासक सहभाग घेतील.

       दुपारी १२ वाजता विदर्भ साहित्य संघाचे दिवंगत अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या आठवणीना उजाळा देणारा आठवणीतले मनोहर म्हैसाळकर हा विशेष कार्यक्रम होणार असून यात आशुतोष शेवाळकर, कमर हयात, प्रकाश दुबे, माधव सरपटवार आणि विदर्भ साहित्य संघाचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप दाते सहभागी होणार आहेत.

     दुपारी २ वाजता अभिरुप न्यायालय होणार असून यात आरोपी म्हणून ज्येष्ठ लेखिका आणि कादंबरीकार शुभांगी भडभडे सहभागी होतील तर आरोपीचे वकील म्हणून प्रकाश एदलाबादकर आणि सरकारी वकील म्हणून डॉ. रवींद्र शोभणे काम पाहतील. न्यायाधीशाची भूमिका मोहन पांडे पार पाडतील.

सायंकाळी ४ वाजता संमेलनाचे समारोप होणार तसेच संमेलनानंतर सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम असेल.

या साहित्य संमेलनातील भरगच्च कार्यक्रमांची साहित्य रसिकांना मेजवानी असणार आहे तरी या साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे माजी कुलगुरु डॉ. किर्तीवर्धन दिक्षित यांचेसह संमेलनाचे संरक्षक प्रशांत पोटदुखे, संमेलन कार्याध्यक्ष व सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी डॉ श्याम मोहरकार, सूर्यांशचे अध्यक्ष व संमेलन कार्यवाह इरफान शेख, सचिव प्रदीप देशमुख, विवेक पत्तिवार , गीता देव्हारे - रायपूरे, सुरेश गारघाटे , स्वप्नील मेश्राम व संमेलन आयोजन समितीतील अन्य सदस्यांनी केले आहे.


भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल...तयारी अंतिम टप्यात


चंद्रपूर १५ डिसेंबर- विदर्भ साहित्य संघाच्या ( Vidarbha Sahitya Sangha) शताब्दी वर्षानिमित्ताने चंद्रपुरात ६८ वे विदर्भ साहित्य संमेलनस आजपासून प्रारंभ होत आहे. चंद्रपूरातील अग्रणी शिक्षण संस्था सर्वोदय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ व सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने १६, १७ व १८ डिसेंबरला प्रख्यात विचारवंत आणि लेखक डॉ. वि. स. जोग यांचे अध्यक्षतेत स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात सदर साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. दरम्यान संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. Chandrapur | Vidarbha Sahitya Sangha

संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी १६ डिसेंबर २०२२ ला सरदार पटेल महाविद्यालयाच्या संयोजनात ग्रंथदिंडीनंतर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ६७ वे विदर्भ साहित्य संमेलनाचे पुर्वाध्यक्ष डॉ. म.रा.जोशी, ज्येष्ठ विचारवंत डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ज्येष्ठ विधीज्ञ डॉ. फिरदौस मिर्जा, सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई शांताराम पोटदुखे व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.

संमेलनात ग्रंथप्रदर्शन, शिल्प आणि चित्र यांचे दालन राहणार असून एकुण तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात साहित्य आणि संस्कृतीवर विचारमंथन होईल. उद्घाटन समारोप सत्रांसह, कथाकथन, पाच चर्चासत्रे, अनुभकथन, निमंत्रितांचे कविसमेलन चंद्रपूर. गडचिरोली जिल्हयातील कविंचे स्वतंत्र कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि २ नाटके या संमेलनात सादर होतील.

१७ डिसेंबर रोजी भानु कुळकर्णी यांच्याद्वारे ”कटयार काळजात घुसली“ हे नाटक सादर केले जाणार आहे. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे हे प्रामुख्याने उपस्थित राहतील.

 १८ डिसेंबर २०२२ रोजी समारोपीय कार्यक्रमाला माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार, खासदार बाळु धानोरकर, आ. प्रतिभा धानोरकर प्रामुख्याने उपस्थित राहतील. संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली असून माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव तथा संरक्षक प्रशांत पोटदुखे, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संमेलन कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद काटकर यांच्यासह सुर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख, वि. सा. संघाचे केंद्रीय सदस्य डॉ. श्याम मोहरकर यांनी संमेलन परिसराचा आढावा घेतला. दरम्यान या संमेलनाला साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

-------About --Vidarbha Sahitya Sangha---------------
विदर्भ साहित्य संघ ही विदर्भातील सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. ही संस्था अण्णासाहेब खापर्डे यांनी जानेवारी १४, इ.स. १९२३ रोजी अमरावती येथे स्थापन केली. त्यानंतर मार्च १९५०मध्ये तिचे मुख्य कार्यालय नागपूरला हलवण्यात आले. आजही ते नागपूर येथेच आहे. शहरातील संस्थेचे सभागृह झाशी राणी चौकात, सिताबर्डी येथे आहे.

Chandrapur December 15- The 68th Vidarbha Sahitya Sangha is starting from today in Chandrapur on the occasion of the centenary year of Vidarbha Sahitya Sangha. On 16th, 17th and 18th of December eminent thinker and writer Dr. Vs. S. Under the chairmanship of Mr. Jog, the local Priyadarshini Indira Gandhi Auditorium will host a series of programs in the Sahitya Samela. Meanwhile, the preparations for the meeting have reached the final stage.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.