Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

बुधवार, डिसेंबर २८, २०२२

राज्यातील 4000 पत्रकारांना विमा कवच देणार Insurance policy

पत्रकारांसाठी कल्याणकारी योजनांचा राज्यस्तरीय कार्यशाळेत निर्धार
---
व्हॉइस ऑफ मीडिया : देशातील 23 राज्यांमध्ये अठरा हजार सदस्य असलेली संघटना.
---
संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राज्याध्यक्ष राजा माने, प्रख्यात साहित्यिक यशवंत मनोहर यांचे मार्गदर्शन
---
पत्रकारांना दहा लाखाचे विमा कवच प्रदान सोहळ्याला बुलडाण्यातून सुरुवात
---
प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार भवन पत्रकारांची विमा पॉलिसी व हाऊसिंग सोसायटी साठी व्हॉइस ऑफ मिडिया पुढाकार घेणार.
-----------बुलडाणा : देशभरातील 23 राज्यांमध्ये 18000 पत्रकार सदस्य असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत पत्रकारांना विमा कवच प्रदान करण्याचा सोहळा बुलडाणा जिल्ह्यातील दोनशे पत्रकारांना विमा पॉलिसीचे वाटप करून करण्यात आला. याचबरोबर संघटनेने राज्यातील 4000 पत्रकारांना विमा कवच देणार, पत्रकारांसाठी हाउसिंग सोसायटी स्थापन करणार व प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी पुढाकार घेणार असल्याचा निर्धार व्हॉइस ऑफ मीडियाच्या थेट कृती कार्यक्रम अभियाना अंतर्गत यावेळी करण्यात आला.
व्हॉइस ऑफ मिडिया संघटनेची राज्यस्तरीय कार्यशाळा बुलडाणा येथील चिखली मार्गावरील नर्मदा हॉलिडेज मध्ये घेण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राजा माने हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रख्यात साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, संघटनेचे संस्थापक तथा संपादक संदीप काळे, संघटनेच्या उर्दू विंगचे प्रमुख मुफ्ती हारून नक्वी, दिल्ली येथील भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाचे अध्यक्ष डॉ. नरेश बोडखे, आमदार संजय गायकवाड, राज्य उपाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील, संघटक सुधीर चेके पाटील, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले, संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
----
लोकशाही मूल्य संवर्धनात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची : डॉ. यशवंत मनोहर
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यामुळे लोकशाहीची मूल्ये संवर्धन करण्यात पत्रकारांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये पत्रकारांनी सहजपणे सत्य समोर मांडले पाहिजे असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक यशवंत मनोहर यांनी केले. ते पुढे म्हणाले न्यायपालिका कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यामध्ये जेव्हा संघर्ष उद्भवतो तेव्हा पत्रकारितेने लोकशाहीची मूल्ये संवर्धना करण्याची भूमिका घेऊन संविधानाचे पालन केले आहे पत्रकार हा केवळ व्यवस्थेवर अंकुश ठेवणारा डोळा नसून तो समाजाचा मेंदू म्हणून कार्यक्रम असला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. नरेश बोडखे:- पत्रकारिता क्षेत्रांमध्ये नव्याने प्रवेश करणारे मीडिया हाऊस व कार्पोरेटर्स यांचा हेतू तपासण्याची गरज असून येथे कार्पोरेटर प्रवेश करतात तेथे नफेखोरी व व्यापारी व्यक्तीला चालना मिळते व त्यातून दर्जा आणि गुणवत्ता याचा ऱ्हास होतो. असे विचार मांडले.
--
पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघटना : संदीप काळे
व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेने अल्पावधीतच देशभरातील 23 राज्यांमध्ये विस्तृत जाळे निर्माण केले आहे. याशिवाय पत्रकारांचे न्याय हक्क, सकारात्मक पत्रकारिता, पत्रकारांच्या आरोग्य, घरांचे प्रश्न, यासह मुलांचे शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रातील नवीन आव्हाने या विषयावर संघटना काम करणार आहे. याकरिता संघटनेने थेट कृती कार्यक्रम हाती घेतला असून अविश्रांतपणे तो चालविला जाईल.
----
पत्रकारांच्या हितासाठी कृती कार्यक्रम : राजा माने
व्हाट्सअप मीडिया ही संघटना देशात उभी राहत असलेली पत्रकारांच्या हक्कासाठीची एकमेव चळवळ आहे. या माध्यमातून पत्रकारांचे हित निश्चितपणे जोपासले जाईल.
---
भाईचारा हा आदर्श : मुक्ती हारून नक्वी
उर्दू दैनिकांच्या पत्रकारांचे प्रश्न मांडून व्हाईस ऑफ मीडियाने त्यांना सामावून घेऊन निर्माण केलेला भाईचारा हा इतरांसमोर आदर्श आहे. उर्दू पत्रकार ते समोर अनेक आव्हाने असल्याचेही त्यांनी सांगितले.
--
समाजकारणाची आवड असणारेच पत्रकार : विद्याधर महाले
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जाणाऱ्या पत्रकारांसमोर अनेक आव्हाने आहेत इतर स्तंभांच्या तुलनेत त्याचे आर्थिक बाजू अत्यंत कमकुवत असते तरीही रात्रंदिवस एक प्रहरी म्हणून ते समाजात काम करीत असतात पत्रकारांच्या हाऊसिंग सोसायटी संदर्भात येणारे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू.
---
पत्रकारांसाठी कल्याण निधी उभारणार : अनिल म्हस्के
बुलढाणा जिल्ह्याने पत्रकारांच्या विमा पॉलिसी साठी पुढाकार घेतला असून यापुढे पत्रकाराच्या आरोग्य घरे मुलांचे शिक्षण या विषयात मदत करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकार निधी उभारण्याची संकल्पना आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल.
---
सकारात्मक पत्रकारितेसाठी पुरस्कार : सुधीर चेके पाटील  

पत्रकारांसाठी पुरस्कारांचे आयोजन करण्याची घोषणा करुन सकारात्मक लिखाण करण्याची भावना वाढीस लागावी व चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन मिळावे ही भूमिका मांडली. 
----
विशेष सत्कार 
बुलडाणा येथील पत्रकार भवनाच्या वास्तूसाठी 50 लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल आमदार संजय गायकवाड यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. समाजाच्या हितासाठी झटणाऱ्या पत्रकारांचाही विचार सहानुभूतीने करून त्यांच्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज असल्याचे सांगून आपण पत्रकारांसाठी गृहनिर्माण विषयातही पुढाकार घेऊ असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
कार्यशाळेची सुरुवात सज्जनसिंग राजपूत यांचा महाराष्ट्र गीताने झाली. यावेळी संघटनेच्या भूमिकेबाबत ध्वनी चित्रफित दाखविण्यात आली. बुलडाणा शहरात सातत्याने 25 वर्षे केबल नेटवर्क च्या माध्यमातून कार्य करणाऱ्या सुधाकर अहेर, हिवरा आश्रम येथील 12 अनाथ विद्यार्थ्यांचे पालन पोषण करणाऱ्या अनंत शेळके यांचे विशेष सत्कार करण्यात आले.
एवढी प्रतिनिधी स्वरूपात दहा लाखांच्या विमा पॉलिसीचे वितरण पत्रकारांना करण्यात आले.
----


पत्रकारांनी चळवळीतील कार्यकर्ता जिवंत ठेवला : रविकांत तुपकर
सामान्य माणसाला पत्रकारांचा आधार वाटतो. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर समाजाची भिस्त असून लोकशाही धोक्यात आली हे सांगण्यासाठी न्यायाधीशांना देखील पत्रकारांकडेच यावे लागते. त्यामुळे लढवय्या पत्रकाराला देखील सांभाळण्याची जबाबदारी समाजाने घेतली पाहिजे. व्हॉइस ऑफ इंडिया या संघटनेने पत्रकारांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम हाती घेतले असून ते कौतुकास्पद आहे.
संघटनेची ही कार्यशाळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने झाल्याबद्दल सर्वच प्रमुख वक्त्यांनी  संघटनेच्या बुलढाणा शाखेचे कौतुक केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धेश्वर पवार व दिव्या भोसले पाटील यांनी केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.