सीताफळ तोडण्यासाठी झाडावर चढण्याचा प्रयत्नात असतांना ३ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, नोव्हेंबर १२, २०२२

सीताफळ तोडण्यासाठी झाडावर चढण्याचा प्रयत्नात असतांना ३ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू


नागपूर:
नागपूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली आहे. सिताफळ तोडण्यासाठी गेलेल्या एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.नागपूरच्या कपिल नगर पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. विहान शाहू हा तीन वर्षांचा चिमुकला त्याच्या घरी खेळत होता.

 दारासमोर सिताफळचे झाड आहे. त्याला सीताफळ खाण्याचा मोह आवरता आला नाही.आणि त्याने झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा पाय हा स्लिप झाला आणि तो विहिरीत पडला.या वेळेवर घरी कोणीच नव्हते. त्यानंतर कालांतराने आई आली आणि विहान ला शोधू लागली.मात्र विहान हा कुठेच दिसत नव्हता त्यानंतर तिने विहिरीत डोकावून बघितले असता विहाणचा मृतदेह तरंगताना दिसला.

 आरडा ओरड झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.#khabarbat #खबरबात