सोमवार, नोव्हेंबर ०७, २०२२

*भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ मंगळवारी सामाजिक संघटनांची बैठक*

*भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ मंगळवारी सामाजिक संघटनांची बैठक*चंद्रपूर :- काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेत देशातील प्रगतीशिल आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या भारत जोडो यात्रेला समर्थन देण्यासाठी चंद्रपूर शहरातील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक मंगळवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हॉटेल एन डी येथे आयोजित करण्यात आली आहे.

जातीय, धार्मिक विव्देषाचा आणि सामाजिक विषमतेचा बिमोड करत संपूर्ण भारत जोडणा-या या यात्रेचे 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रत आगमन झाले. फॅसिझम, कम्युनलिझम आणि क्रोनी कॅपिटलिझमच्या विरूध्द पुन्हा एकदा समाजातील जबाबदार घटक एकत्र येत आहे. त्या दृष्टीने भुमिका निश्चित करण्यासाठी चंद्रपूर शहरातील हॉटेल एन डी येथे आठ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता गांधी विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनात बैठक होणार आहे.

यावेळी बैठकीला माजी मंत्री ब्रह्मपुरीचे तथा आमदार विजय वडेट्टीवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, आमदार प्रतिभा धानोरकर यांची देखील उपस्थिती राहणार आहे.

भारत जोडो संदर्भात या बैठकीत संवाद आणि विचार व्यक्त होणार आहे. बैठकीला चंद्रपूर शहरातील आणि जिल्ह्यातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक तथा खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.


*भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ मंगळवारी सामाजिक संघटनांची बैठक*

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.