गुरुवार, नोव्हेंबर ०३, २०२२

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली एस. टी.नागपूर परिवहन विभाग नियंत्रकांची भेट


*एस. टी.नागपूर परिवहन विभागाचे नवनियुक्त विभागीय नियंत्रक श्री.श्रीकांत गभने यांची म.न.रा.प.का.से. पदाधिकारी यांनी घेतली सदिच्छा भेट.*मनसे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे यांनी *महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या अध्यक्षपदी श्री. विकास आकलेकर यांची अलीकडेच नियुक्ती केली*. कार्याध्यक्ष पदावर अनेक वर्षे कार्यभार सांभाळणाऱ्या श्री विकास आकलेकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधला आणि चर्चा केली. या अनुषंगाने नागपूर परिवहन विभागाचे नवनियुक्त विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने यांची सदिच्छा भेट घेण्यात आली

व एस टी कर्मचाऱ्यांच्या काही समस्यांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी म.न.रा.प.का.से. तर्फे आलेल्या सूचनांकडे नक्की लक्ष देऊन त्यावर अंमलबजावणी करू असे विभाग नियंत्रक यांनी सांगितले व भविष्यात म.न.रा.प.का.से. कडून नेहमीप्रमाणे सहकार्य मिळेल असा आशावाद व्यक्त केला.


तद्नंतर एस. टी. महामंडळाच्या पस्तीस वर्षांपासून जास्त काळ सेवेमध्ये प्रामाणिकपणे आपली सेवा बजावून येणाऱ्या पुढील महिन्यात सेवानिवृत्त होणारे एस टी कर्मचारी श्री दत्तात्रय राजकारणे यांचीसुध्दा म.न. रा. प.का.से. पदाधिकारी यांनी भेट घेतली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे पदाधिकारी सर्वश्री अजय ढोके, राम मांडवगडे, लक्ष्मण बाराई, पराग शेंडे, महेंद्र तांबे, राजू ऊइके तसेच आमचे मित्र कष्टकरी जनसंघाचे सरचिटणीस प्रवीण डफळे उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.