आरोपीस ताब्यात घेवुन मुद्देमाल जप्त | Local Police Stations Crime News - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, नोव्हेंबर २५, २०२२

आरोपीस ताब्यात घेवुन मुद्देमाल जप्त | Local Police Stations Crime Newsपोलीस स्टेशन, रामनगर येथे दिनांक २२/११/२०२२ रोजी फिर्यादी अजय जानाजी पप्पुलवार, वय ५७ वर्ष, रा. उर्जानगर, कॉलनी, दुर्गापुर, चंद्रपुर यांनी रिपोर्ट दिली की, त्याचे भाऊजी  मधुकर पेशेट्टीवार हे आपले परिवारासह दिनांक १२/११/२०१२ रोजी मुलीला भेटण्याकरीता पुणे येथे गेले होते. दिनांक २२/११/२०२२ रोजी बहीनीचे सांगणे वरून त्यांचे घरी जावुन पाहीले असता घराचे समोरील दरवाज्याचे लॉक तोडुन दिसला. त्यावेळी आतमध्ये जावुन पाहीले असता, घरामधील बेडरूमचे सामान अस्ताव्यस्य स्थिती दिसले तसेच लोखंडी आलमारीचा लॉक तोडुन दिसला. तेव्हा सदर घटनेबाबत भाउजी पेशेट्टीवार यांना सांगितले असता, त्यांनी लोखंडी आलमारी मधील सोन्याचे दागीने ठेवल्याचे सांगितले, तेव्हा मी पाहीले असता, एक सोन्याची चैन १४ किमत ४०,०००/- रू दिसुन आली नाही. तेव्हा मी पोलीस स्टेशन रामनगर येथे चोरी सल्याबाबत तक्रार दिली . रिपोर्ट वरून पोस्टे रामनगर येथे अप.क्र. ११८७ / २०२२ कलम ४५४४५७ ३८० भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.

मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार साहेब, मा. पोलीस निरीक्षक श्री. राजेश मुळे पोस्टे रामनगर यांचे मार्गदर्शनात गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी पोलीस स्टेशन, रामनगर येथील डी.बी पथक मधील सपोनि हर्बल करे तसेच पोउपनि विनोद भुरले, पोतपनि मधुकर सामलदार व कर्मचारी असे पोस्टे परिसरात रवाना होवुन आरोपीस ताब्यात घेवुन मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांना अधिक विचारपुस केली असता यापूर्वी पोस्टे रामनगर येथील जनता कॉलेज परिसरात घरफोडी केल्याचे सांगितले आहे.

आरोपीचे नाव :- १) विशाल सुधीर पाटील, वय २२ वर्ष, 
२) कबीर अरुण पाझारे, वय १९ वा दोन्ही रा. सिस्टर कॉलनी, चंद्रपुर

३) श्रीकांत उर्फ बोटया राजु चुनारकर, रा. आनंदनगर, महाकाली कॉलरी, चंद्रपुर 

जप्त माल :- १] एक सोन्याची अंगुठी वजन ५ किगत २०,०००/- रु
२) एक सोन्याची गोप वजन १२ किमत ४५,०००/- 
३) एक सोन्याची अंगुठी ५ ग्राम जी कि २०,000/-
४) एक सोन्याची अंगुठी ५ राम जी कि २००/-रु
५) एक सोन्याची रिंग ज्यात लहान स्ट्रोन असलेला जनम कि २०,०००/-रु
६) एक सोन्याची अंगुठी ज्यात गुलाबीत असलेली २ किमंत १०,०00/-
७) गुन्हयात चोरी करण्याकरीता वापरलेला रोड किमंत २००/-

असा एकुण १,३५,२००/- रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. रविंद्रसिंग परदेशी सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. सुधीर बंदनवार सा. यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक श्री. राजेश मुळे, सपोनि हर्बल अकरे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पो. हवा. रजनीकांत पुलावार, पोहवा / २४५४ प्रशांत शेदरे, नापोशि/ १२२९ विनोद यादव, नापोशि/११७६ किशारे वैरागडे, नापोशि/ २१८२ चिकाटे, नापोशि/ मिलींद दोडके, नापोशि/ ११६५ आनंद नापोशि/ ९१७ निलेश मुडे, नापोशि/ सतिश अवथरे, नापोशी / २४३० लालु यादव, पोशि/२५१३ विकास जुमनाके, पोशि/ हिरालाल गुप्ता, पोशि/८८१ संदिप कामडी, पोशि/ ६९९ विकास जाधव, मनापोशि/ भावना रामटेके यांनी केलेली आहे.