वरोरा शहरात अनियमित पाणीपुरवठा; आमदारांनी घेतली ही ॲक्शन - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, नोव्हेंबर ०७, २०२२

वरोरा शहरात अनियमित पाणीपुरवठा; आमदारांनी घेतली ही ॲक्शन

वरोरा शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याबाबत आमदार धानोरकर यांनी प्रशासनाला सुनावले
*वरोरा:*
वरोरा शहरात होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याबाबत आमदार प्रतिभाताई धानोरकर आज थेट नगर परिषदेत पोहचल्या. प्रशासनाला याबाबत जाब विचारून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलद गतीने पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
मागील दोन महिन्यापासून पूर्ण शहरात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे आल्या होत्या. आज सोमवारी सकाळी आमदार धानोरकर पदाधिकाऱ्यांसह नगर परिषदेत धडकल्या. मुख्याधिकाऱ्यांसह पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी याबाबत खडे बोल सुनावले. पाणीपुरवठ्याबाबतच्या अडचणी जलदगतीने सोडवून वरोरा शहराचा पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देऊन, नवीन पाणी पंप खरेदीसाठी आमदार निधीतून दहा लाख रुपयांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सुचना केल्या.
अनेक दिवसापासून रखडलेल्या नवीन विस्तारित पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याच्या दृष्टीने लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन योजना मार्गी लावण्यासाठी
प्रयत्न घेऊ असेही आमदार धानोरकर म्हणाल्या.
              याप्रसंगी मुख्याधिकारी गजानन भोयर, पाणीपुरवठा अभियंता लाड, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, गजानन मेश्राम, राजु महाजन, छोटूभाई शेख, अनिल झोटिंग व इतर पदाधिकारी आणी नगर परिषदेतील पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.