सोमवार, नोव्हेंबर ०७, २०२२

एकाच कुटुंबाचे चारजण होते वाहनात; भरधाव कारने चालत्या ट्रकला मागून धडक
शिरीष उगे (तालुका प्रतिनिधी)
वरोरा : रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील वरोरा तालुक्यातील येन्सा गावाजवळ चालत्या ट्रक ला कार ने मागून धडक दिली. या अपघातात चार जन गंभीर जखमी झाले.
परेश प्रफुल भुरा (रा. नागपूर) हे आपल्या कुटुंबासह नागपूर वरून चंद्रपूर कडे जात असतांना याच मार्गाने समोर जात असलेल्या ट्रक (क्र. सी.जि. 04 झेड.डी. 1200) ला मागून भरधाव येणाऱ्या कार (क्र. एम. एच. 49 ए.एस. 8520 ) ने धडक दिली यामध्ये कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. कार मध्ये बसलेले परेश भुरा (35), प्रफुल भुरा(60), पिंकी प्रफुल भुरा(31), शानू परेश भुरा(5) हे चार जन गंभीर जखमी झाले. अपघाताची वरोरा पोलिसांना माहिती मिळताच अपघात स्थळी धाव घेतली व जखमींना वरोरा उपरुग्णालयात दाखल करणे यामध्ये परेश भुरा यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना चंद्रपूर येथे रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास ठाणेदार खोब्रागळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किटे करित आहे.
chandrapur, nagpur, bhadrawati

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.