इको प्रो तर्फे पक्षी निरीक्षण दरम्यान पक्षी चित्र प्रदर्शनी - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, नोव्हेंबर ०८, २०२२

इको प्रो तर्फे पक्षी निरीक्षण दरम्यान पक्षी चित्र प्रदर्शनी

▫️विविध पक्षांची चित्रे लावून विध्यार्थिनी घेतला सहभाग

शिरीष उगे (तालुका प्रतिनिधी)
भद्रावती : भद्रावती इको प्रो च्या वतीने सुरु असलेल्या आठ दिवसीय पक्षी सप्ताह आज हुतात्मा स्मारक येथे मी पाहिलेला पक्षी विध्यार्थ्यांची चित्र प्रदर्शनी आयोजित केली आहे. पहिल्याच दिवशी विविध पक्षांची चित्रे लावून विध्यार्थिनी घेतला सहभाग घेतला होता.
तरी आपल्या पैकी बऱ्याच लोकांना पक्षानं बद्दल माहिती नसते कुठल्या पक्षाचे काय नाव आहे खास करून लहान मुलांना पक्षानं बद्दल माहीती मिळावी यासाठी पक्षी निरीक्षणी दरम्यान एक चित्र प्रदर्शनी चा कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रदर्शनीचे उदघाटन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. व पहिल्याच दिवशी शेकळो विध्यार्थीनी चित्र प्रदर्शनी स्थळी भेट दिली.
यावेळी भद्रावती तालुक्यातील विध्यार्थिना उद्या दि. 9 तारखेला 9 वाजता चित्र पाहणी करिता हुतात्मा स्मारक भद्रावती येथे भेट देऊन विविध पक्षी समंधी माहिती जाणून घ्यावी. असे धानोरकर यांनी सांगितले आहे.
या प्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, इकोप्रो अध्यक्ष संदीप जिवने, अमोल दौलतकर, किशोर खंडाळकर, हुनुमान घोटेकर, शुभम मेश्राम, मंगेश पढाल, सुमेध साठे, प्रशांत डेहनकर छत्रपती देवतळे, राहूल सपकाळ, दिपक कावठे, दिपेश गुरनुले, पवन मांढरे उपस्थित होते.