सम्राट अशोक विद्यालयात बिरसा मुंडा यांना अभिवादन. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, नोव्हेंबर १५, २०२२

सम्राट अशोक विद्यालयात बिरसा मुंडा यांना अभिवादन.


संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि. १५ नोव्हेंबर:-
जननायक,स्वातंत्र्य सैनिक,क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती सम्राट अशोक विद्यालय उमरी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस. टेंभुर्णे हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सावरटोला ग्रामपंचायतचे सरपंच युवराज तरोणे, पाहुणे म्हणून ग्रामसेवक चिमणकर, भागवत मुनेश्वर,जे.एस.हटवार. के. एम.भैसारे,एम.यु.घरोटे उपस्थित होते. प्रारंभी सरपंच तरोणे,मुख्याध्यापक टेंभुर्णे तसेच सर्व अतिथींनी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडून संचालन एस. व्ही. बडोले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार एच.एस. पात्रीकर यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक,विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम. एम.साखरे,बी.आर.पंचलवार यांनी सहकार्य केले.