मंगळवार, नोव्हेंबर १५, २०२२

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन संकुलातील हिल टॉप गार्डनच्या पाण्याच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू. अर्जुनीच्या नंदनवार परिवारावर कोसळले दुःखाचे डोंगर.

अर्जुनीच्या नंदनवार परिवारावर कोसळले दुःखाचे डोंगर.संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध:-दि.१५ नोव्हेंबर:-
सफल होमानंद नंदनवार वय ४ वर्ष राहणार अर्जुनी-मोर या मुलाचा येथील राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटन संकुलातील हिल टॉप गार्डन मधल्या पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत झाला.
अर्जुनी-मोर येथील रहीवाशी असलेला सफल हा मुलगा आई स्नेहा नंदनवार व इतर ८९ महिला सोबत नवेगावबांध येथे पर्यटना करिता हिलटाॅप गार्डन ला आला होता. पर्यटनास आलेल्या सर्वानी डबा भोजन केला.दरम्यान लहान-लहान मुले गार्डन मधे खेळत असतानाच सफल हा गार्डन मधील पाणी टाक्यात पडला. याची माहीती सफल सोबत खेळत असलेल्या लहान मुलांनी आई ला सांगीतले.लगेच सफल ला पाणी टाक्यामधून बाहेर काढून नवेगावबांध येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान उपचारा आधीच मृत्यू झाला, असे डाॅक्टरानी सांगीतले.घटनेची माहिती मिळताच सफलचे वडील होमानंद नंदनवार हे तातडीने अर्जुनीवरून नवेगाव बांध येथील ग्रामीण रुग्णालयात आले. त्यानंतर सर्व घटनेची माहीती घेवून,मुलगा सफल याचा मृतदेह सोबत घेवून गेले. एकुलत्या एक मुलगा सफल च्या या दुर्दैवी मृत्यूने अर्जुनी-मोर येथील नंदनवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.सफल च्या अचानक जाण्याची वार्ता तो रहात असलेल्या कालनीत वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सफल दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण कालनीत दुःखाचे सावट पसरले आहे. मृतकाच्या पाल्यांनी मात्र पोलिसात तक्रार द्यायची टाळले. फिल्टर गार्डन येथे येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या पाल्याची जबाबदारी स्वतः घ्यायला पाहिजे गार्डनमध्ये खेळणाऱ्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे अन्यथा असे दुर्दैवी घटना घडतच राहतील अशी चर्चा पर्यटन संकुल परिसरात पर्यटकांमध्ये होती. खबरदारीचा उपाय म्हणून हिल टॉप गार्डनच्या व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही उपाययोजना करावी. असे या निमित्ताने पर्यटकांनी मागणी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.