Asian Development Bank Officials Visit Nagpur Metro Project - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, नोव्हेंबर २५, २०२२

Asian Development Bank Officials Visit Nagpur Metro Project

4-Member Officials’ Team Visits Stations, Discusses Project Aspects
NAGPUR, 24: A 4-member team of Asian Development Bank (ADB) Officials visited Nagpur Metro Project. The team was on a three -day visit to Nagpur Metro Rail Project, which concluded today (24th November). The team included Mr. Mukund Sinha (Principal transport specialist), Mr. Sharad Saxena (Principal transport specialist), Mr. Kaushal Sahu (Senior project officer), Mr. Mihir Sorti (Senior project officer).

The team discussed the Nagpur Metro Project at length with Maha Metro MD Dr Brijesh Dixit and also reviewed the proposed Second Phase. The team was briefed about the various aspects of the Nagpur Metro Rail Project and was given a detailed presentation.

The team of officials visited Khapri, Lokmanya Nagar, Sitabuldi Interchange, Zero Mile Freedom Park Metro Stations. The officials inspected Ticket Counter, Parking Areas, Multi-Modal Integration (MMI), Emergency Services, Bio-Digester, and Water Recycling Plant. They also sought information about Digital Ticketing and Feeder Services. The ADB officials were also briefed about the several steps regarding the Property Development (PD) taken by Maha Metro.

The team visited Metro Bhavan and saw the various initiatives like Exhibition Centre, Experience Centre and Operational Control Centre (OCC). The team was given a presentation about the various aspects of the Nagpur Metro Project. The Director (Project) Shri Mahesh Kumar, Director (Rolling Stock, System and Operations) Shri Sunil Mathur, Director (Strategic Planning) Shri Anil Kokate and Director (Finance) Shri Harinder Pandey were present on the occasion.


  *एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या शिष्ट मंडळाची नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट*

·         *३ दिवसीय दौऱ्यादरम्यान विविध विषयांवर केली चर्चा*


नागपूर २४ :  एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) ४ सदस्यीय शिष्ट मंडळाने महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा तीन दिवसीय दौरा केला. सदर दौऱ्यात एडीबीचे श्री. मुकुंद सिन्हाश्री. शरद सक्सेनाश्री. कौशल शाहू आणि श्री.मिहीर सोरती या चार अधिकाऱ्यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्याशी चर्चा करत मेट्रो रेल प्रकल्पाची तसेच नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज - २ ची देखील सविस्तर माहिती जाणून घेतली. महा मेट्रोच्या वतीने या शिष्टमंडळाना प्रकल्पाचे प्रस्तुतीकरण देण्यात आले. एशियन डेव्हलपमेंट बँक ही आशिया युनियनचे सभासद असलेल्या विविध देशांच्या अखत्यारीत आहे. पत पुरवठा करणाऱ्या मोठ्या जागतिक बँकांमध्ये या बँकेची गणना होते.

या शिष्ट मंडळाने हिंगणा डेपो,लोकमान्य नगरसिताबर्डी इंटरचेंजखापरी मेट्रो, झिरो माईल फ्रीडम पार्क  स्टेशन पाहणी केली. मेट्रो स्टेशन येथील तिकीट काउंटरडिजिटल तिकीटपार्किंग परिसरमल्टी मॉडेल इंटिग्रेशनफीडर सेवाअग्निशमन उपकरणेएअर कंडिशनिंगचार्जिंग सेंटरबायो डायजेस्टरवॉटर रिसायकलिंग प्लांटरेन वॉटर हार्वेस्टिंग संसाधनांची माहिती जाणून घेतली. महा मेट्रोद्वारे मेट्रो स्थानक आणि परिसरात उपलब्ध व्यावसायिक क्षेत्र मालमत्ता विकास इत्यादींची देखील त्यांनी यावेळी पाहणी केली.

 स्थानकांची आणि एकूणच कामकाजाची पाहणी सोबतच या पथकाने मेट्रो भवनच्या नियंत्रण कक्षाला देखील भेट दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्षासंबंधी सविस्तर माहिती या अधिकाऱ्यांना दिली. महा मेट्रोतर्फे करण्यात येत असलेल्या विविध कामांची माहिती एडीबी चमूला देण्यात आली. यावेळी संचालक (प्रकल्प) श्री. महेश कुमारसंचालक (रोलिंग स्टॉक) श्री. सुनील माथूरसंचालक (स्टेटर्जिक प्लॅनिंग) श्री. अनिल कोकाटेसंचालक (वित्त) श्री. हरिंदर पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.