शनिवार, नोव्हेंबर ०५, २०२२

Chandrapur Local Breaking News| चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा वाघाचा हल्ला

वाघाच्या हल्ल्यात इसम ठार
ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापूर येथील घटना

वाघाच्या हल्ल्यात दोन दिवसात दोन ठारशहर प्रतिनिधी ब्रम्हपुरी :- तालुक्यातील तोरगाव ( बुजुर्ग) येथे दोन दिवसापूर्वी शेतात काम करणाऱ्या महिलेला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज तिसऱ्या दिवशी वाघाने लाखापूर येथील जंगल परिसरात इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.जगन पानसे राह. लाखापुर असे मृतक इसमाचे नाव आहे.

मृतक इसम जगन पानसे हे काल दिनांक चार नोव्हेंबरला काड्या तोडण्याकरिता जंगलात गेले होते मात्र रात्र होऊनही ते घरी परतले नव्हते. आज जंगलामध्ये त्यांचा शोध घेतला असता मृतदेह आढळून आला . वाघाच्या हल्ल्यात सदर इसम ठार झाल्याचे निष्पन्न झाले असून घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली गावकऱ्यांनी केली आहे आहे. वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नरभक्षक वाघाला पकडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.