वृद्धांचे आश्रयस्थान म्हणजे डेबू सावली - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑक्टोबर २९, २०२२

वृद्धांचे आश्रयस्थान म्हणजे डेबू सावलीकुणी रस्त्याकडेला बेवारस आढळलेले…कुणी रेल्वे स्थानकावर…कुणाला उपचाराच्या बहाण्याने नातेवाईकांनी रुग्णालयात सोडून दिलेले… कुणाला संपत्तीच्या लालसेतून मुलांनी घरातून हाकलून दिलेले… इथल्या प्रत्येक वृद्धाची कहाणी वेगळी… हदय पिळवटून टाकणारी…पण, आयुष्याच्या संध्याकाळी किमान इथे तरी सुरक्षित आसरा मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. हे आश्रयस्थान म्हणजे डेबू सावली वृद्धाश्रम (Debu saoli Vrudhhashram).


थोर महान संत गाडगेबाबा यांच्या विचारांनी प्रेरित आणि आदर्श घेऊन जीवनक्रम करणाऱ्या सुभाषभाऊ शिंदे (subhash Shinde) यांनी समाजसेवेचा वसा घेतला. सराफा व्यावसायिक असूनही त्यांनी समाजातील वृद्ध व्यक्तीची आयुष्याच्या अखेरच्या घटकेत आरोग्याची काळजी घेता यावी आणि राहण्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था करता यावी, यासाठी डेबू सावली वृद्धाश्रमाची स्थापना केली. चंद्रपूरच्या देवाडा येथील महाकाली नगरीत हे वृध्दाश्रम मागील सहा वर्षांपासून श्री डेबूजी समाज विकास बहुद्देशीय संस्था अंतर्गत चालविण्यात येत आहे. शासनाकडून कोणतेही अनुदान नाही. समाजातील प्रतिष्ठित नागिरक विविध उपक्रम राबवून आश्रमासाठी मदत करीत असतात. अनेकदा सुभाषभाऊ स्वतः पदरचे खर्च करून पालनपोषणाचे काम करीत आहेत. सध्या येथे २८ वृद्ध वास्तव्यास आहेत.