जगद्गुरु शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज चंद्रपुरात येणार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, ऑक्टोबर ११, २०२२

जगद्गुरु शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज चंद्रपुरात येणार


चंद्रपूर शहरात पहिल्यांदाच श्री गोवर्धन मठ पीठधीश्वर जगन्नाथपुरी येथून जगद्गुरु शंकराचार्य महाराज श्री निश्चलआनंद सरस्वती जी 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी चंद्रपुरात येत आहेत. चारही वेदांचे आणि वैदिक गणिताचे सखोल ज्ञान असलेल्या महाराजांच्या उपस्थितीत कथा श्रवण कार्यक्रम होणार आहे. 

 #Shankaracharya-Nischalananda-Saraswati


नागपूर मार्गावरील शकुंतला लॉन्स जगन्नाथ धाम येथे 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चार वाजेपासून सात वाजेपर्यंत त्यांच्या सानिध्यामध्ये भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या महाविराट दिव्य धर्म संमेलनात स्वागत सोहळ्याला मोठ्या संख्येने चंद्रपूर शहरातील सर्व धर्म प्रेमींनी उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.