पूर्व समर्थनगर येथे रामलीला व रावणदहन कार्यक्रम - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२

पूर्व समर्थनगर येथे रामलीला व रावणदहन कार्यक्रम        यशवंतराव चव्हाण सोशल फोरम व प्रभाग ३५ तर्फे विजयादशमीच्या (दसरा) निमित्त्ताने बुधवार दि. ०५ / १० / २०२२ रोजी रावणदहन हा धार्मिक उत्सव कार्यक्रम पूर्व समर्थनगर येथील मनपा प्रांगण, नागपूर येथे संपन्न होणार आहे. खेमू व अमर बिनावार यांनी रावणाची ३० फूट उंचीची प्रतिमा तयार केली आहे. रावण दहन या धार्मिक कार्यक्रमाचे हे २५ वे वर्ष आहे. या प्रसंगी धोंडीबाजी परसराम करवटकर यांचा नेत्रदीपक फटाका शो आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला सुमारे २५००० नागरिक दरवर्षी उत्साहाने भाग घेतात. दिलीप पनकुले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

        कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायंकाळी ५ . ३० ते ६ . ०० वाजेपर्यंत श्रीमती सुवर्णा नलवडे निर्मित नावीन्यपूर्ण रामलीलाचे आयोजन केले असून नागरिकांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक संग्राम पनकुले यांनी केले. कार्यक्रमाला मा. खासदार अजय संचेती, मा. आमदार सागर मेघे, मा. आमदार दीनानाथ पडोळे, सुनील रायसोनी, राजू अग्रवाल, विकास पिंचा, देवीलाल जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित राहतील. 

        कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तात्यासाहेब मते, विकास गेडाम, सोपानराव शिरसाट, संजय शेवाळे, बबलू चौहान, श्रीनिवास दुबे, योगेश चौधरी, वसंत घटाटे, गीतेश चरडे, प्रमोद वानकर, मंदार हर्षे, मधुकर भावसार, सरदार रवींद्रसिंग मुल्ला, प्रा. एस. के. सिंग, कृष्णकांत मोहोड, मच्छिंद्र आवळे, निर्मला कुमरे, विजय मसराम, नरेश सिरमवार, अक्षय हाडके, सुशील अरसपुरे, संजय बागडे, प्रशांत चकोर, रवी खडसे, राहूल मोहोड, संसार मिश्रा, अवधेश प्रताप सिंग, प्रमोद सार्वे, सचिन जयस्वाल, आदेश मोहोड, नाना खुटाफळे इत्यादी परिश्रम घेत आहेत.


 Ravan-Dasara-nagpur