बुधवार, ऑक्टोबर ०५, २०२२

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चंद्रपूर शाखेच्या वतीने विजयादशमी उत्सव | Rashtriya Swayamsevak Sangh

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चंद्रपूर शाखेच्या वतीने विजयादशमी उत्सवराष्ट्रीय स्वयंसेवक संघ चंद्रपूर शाखेच्या वतीने दरवर्षी विजयादशमी उत्सव थाटात साजरा करण्याची परंपरा आहे. यानिमित्त शस्त्र पूजन आणि पतसंंचलन केले जाते. यंदा 5 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने  विजयादशमी उत्सवाचे निमित्ताने चंद्रपूर शहरात पथसंचलन आयोजित करण्यात आले. शहरातील नगीनाबाग परिसरातल्या सेंट मायकल शाळेत स्वयंसेवक एकत्रीकरणानंतर पथसंचलनात शिस्तबद्धरित्या सहभागी झाले. नगिनाबाग येथील प्रमुख मार्गांचे भ्रमण करत सेंट मायकल शाळेत पथसंचलनाचा समारोप झाला. चंद्रपूर नगराच्या घोष पथकाने पथसंचलनात चैतन्य आणले. पथसंचलनात नगर संघचालक, शाखा संघचालक यांच्यासह शहरातील संघ स्वयंसेवक सहभागी झाले होते.


Vijayadashami celebration on behalf of Rashtriya Swayamsevak Sangh Chandrapur branch

It is a tradition to celebrate Vijayadashami every year on behalf of Rashtriya Swayamsevak Sangh Chandrapur branch. On this occasion, weapons are worshiped and Patsanchalan is performed. This year on October 5, a street movement was organized in Chandrapur city on the occasion of Vijayadashami festival on behalf of Rashtriya Swayamsevak Sangh. Volunteers at St. Michael's School in Naginbagh area of ​​the city disciplinedly participated in the walkout after the mobilization. The road trip concluded at St. Michael's School, touring the main roads of Naginabagh. Ghosh team of Chandrapur Nagar brought vitality to the road movement. City union volunteers along with city union leaders, branch union leaders participated in the road movement.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.