मंगळवार, ऑक्टोबर ०४, २०२२

रानकवी तुकाराम धांडे यांनी केले शाळेत काव्यवाचन




जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील तेजूर ठाकरवाडी शाळेत रानकवी तुकाराम धांडे यांनी काव्यवाचन केले .

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने श्री.फुलसुंदर (वनक्षेत्रपाल),श्री.कवटे(वनरक्षक) व लांडे(वनरक्षक) यांनी शाळेस भेट देवून वन्यजीव बाबत माहिती देवून मार्गदर्शन केले.
दरम्यानच्या काळात *आदिवासी रानकवी आदि.तुकाराम धांडे* यांचे आगमन स्वागत व कविता सादरीकरण करण्यात आले यामधे इयत्ता 3 री भाषा विषयातील *रानवेडी* व इ.9 वीची कविता त्याच्या मूळ काव्य गायन करून सांगितली मुले मंत्रमुग्ध होवून ऐकत होती.त्याच्या मनामध्ये निसर्गविषयक प्रेम, आपुलकी,मित्रत्वाचे अतूट नाते तयार करण्याचे काम त्यांच्या काव्यवाचनाने झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांगरे सर यांनी केले
स्वागत मुख्याध्यापक . मांडवे आ.का. यांनी केले .कवींचा परिचय उंडे सर यांनी तर आभार . तळपे सर यांनी मानले.कार्यक्रमाचे नियोजन कुडेकर सर यांनी केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.