श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वार्षिक महोत्सवानिमित्त व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी - गडचिरोली वासियांनी घेतला लाभ - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑक्टोबर २७, २०२२

श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वार्षिक महोत्सवानिमित्त व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी - गडचिरोली वासियांनी घेतला लाभ


गडचिरोली (प्रतिनिधी )-
   व्यसनमुक्तीचा विचार पटवून देत जनतेला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य नशाबंदी मंडळ प्रामाणिकपणे करीत आहे. मानवी स्वास्थांविषयक विचार घेऊन स्वच्छता आणि व्यसनमुक्ती विषयावरील सुंदर जनजागृतीपर चित्र प्रदर्शनी श्री गुरुदेव मंडळाच्या प्रांगणात लावलेली होती. महाराष्ट्र नशाबंदी मंडळ जिल्हा शाखेचे संघटक संदीप कटकुरवार आणि जिल्हा प्रमुख उदय धकाते यांनी हे प्रदर्शन येणाऱ्या जनतेसाठी आयोजित केलेले होते.

 समाजातील वाढती व्यसनाधिनता आणि सिगारेट ,तंबाखू , दारू या सारख्या व्यसनांपासून संसाराची कशी राखरांगोळी होते हे चित्र प्रदर्शनी मधून समजून घेता आले. महापुरूषांचे व्यसनमुक्ती संदर्भातील विचार वाचनीय असून ते शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरीता उपयोगी असल्याने त्यासंबंधी पत्रके वाटण्यात आले. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , डॉ. शिवनाथ कुंभारे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी नशाबंदी मंडळाचे ह्या कार्याबद्दल कौतुक केले. चित्रप्रदर्शनीच्या आयोजनासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सदस्यगणांनी तसेच श्री गुरुदेव शाळेच्या शिक्षकांनी सहकार्य केले.