कोंबड्यावर ताव मारणारा बिबट अखेर अडकला पिंजऱ्यात - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२

कोंबड्यावर ताव मारणारा बिबट अखेर अडकला पिंजऱ्यात

चंद्रपुर तालुक्यातील लोहारा गावातील बेघर परिसरात कोंबड्यावर ताव मारणारा बिबट अखेर पिंजऱ्यात अडकला आहे.शनिवारी पहाटेच्या सुमारास हा बिबट पिंजऱ्यात अडकल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

मागील अनेक दिवसांपासून लोहारा गावातील बेघर वस्तीत बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता.गावात येऊन नागरिकांच्या कोंबड्या फस्त करत होता.दरम्यान गावातील नागरिकांनी या बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी वनविभागाकडे केली होती.त्यानंतर वनविभागाने परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते.दरम्यान शनिवारी पहाटे हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला.याची माहिती गावातील नागरिकांना मिळताच नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली.त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 The leopard that attacked the chicken finally got stuck in the cage