कचरा नालीत टाकला; सफाई कामगार निलंबित | Garbage drain | CMC Chandrapur suspended - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, ऑक्टोबर १०, २०२२

कचरा नालीत टाकला; सफाई कामगार निलंबित | Garbage drain | CMC Chandrapur suspendedचंद्रपूर १० ऑक्टोबर -  चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत झोन क्र. १ येथील सफाई कामगार श्रीमती किरण रामसिंग राठोड यांना स्वच्छतेच्या कामात निष्काळजीपणा करून कर्तव्यात हयगय व शिस्तभंग केल्याने निलंबित करण्यात आले आहे.

    सदर सफाई कामगार झोन क्र. १ येथे कार्यरत असुन त्यांच्याकडे संत कवलराम चौक ते विदर्भ हाऊसिंग चौक, दाताला रोड इत्यादीची झडाई, साफ सफाईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. झडाई, साफ सफाई केल्यावर निघालेला कचरा उचलुन जमा करण्याकरीता मनपातर्फे त्यांना डस्टबिन देण्यात आली आहे. परंतु सदर केर कचरा डस्टबिनमध्ये गोळा न करता नालीमध्ये टाकत असल्याचे मनपाचे सहायक आयुक्त यांच्या पाहणीदरम्यान निदर्शनास आले.

    त्यामुळे कर्तव्यावर असतांना स्वच्छतेच्या कामात निष्काळजीपणा करून कर्तव्यात हयगय व शिस्तभंग केल्याचे निदर्शनास आल्याने महानगरपालिका कार्यालयाच्या आदेशान्वये सदर सफाई कामगार यांना निलंबित करण्यात आले आहे.   Garbage | Chandrapur |  Municipal Corporation |  Kiran Ram Singh Rathod, a sweeper  Therefore, the said sweeper has been suspended as per the order of the Municipal Corporation Office, as it has been observed that he was negligent in the cleaning work while on duty and committed dereliction of duty and indiscipline.