माजी नगराध्यक्ष सौ. योगिता पिपरे यांना राष्ट्रसंत साहित्य विशेषांक भेट - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑक्टोबर २७, २०२२

माजी नगराध्यक्ष सौ. योगिता पिपरे यांना राष्ट्रसंत साहित्य विशेषांक भेटगडचिरोली ( प्रतिनिधी)- मानवतेचे महान पुजारी ,थोर तत्त्वचिंतक वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्व संत स्मृतीदिन गुरूकुंज आश्रम मोझरी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राष्ट्रसंतांच्या विचार साहित्यावर आधारित विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले होते. देश विदेशातील मान्यवरांनी यावेळी उपस्थिती दर्शविली होती. हा साहित्य विशेषांक गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्षा सौ. योगिता पिपरे यांना ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी भेट दिला.‌ प्रस्तुत विशेषांक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे वैचारिक दर्शन घडविणारा असल्याचे मत सौ. योगिता पिपरे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगरसेवक श्री. प्रमोद पिपरे उपस्थित होते. श्री गुरुदेव मासिक विभागाच्या वतीने निर्मित ह्या अंकाचे प्रा. डॉ. दीपक पुनसे हे मुख्य संपादक असून लेख संकलन आणि संपादन कार्यात बंडोपंत बोढेकर यांनी सहकार्य दिलेले आहे.


Former Mayor Mrs. Rashtrasant Sahitya Special Award to Yogita Pipere