मंगळवार, ऑक्टोबर ११, २०२२

चंद्रपूर शहरात ई सिगरेटचा साठा जप्त; अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारीचंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर रामनगर पोलिसांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तंबाखू फ्लेवर असलेली सिगरेट पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून दोन दुकानांमधून मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
या सिगरेट चा वापर अल्पवयीन मुलांसाठी केला जातो या सिगरेटच्या माध्यमातून कोणतीही दुर्गंधी येत नसल्याने पालकांना देखील शंका येत नाही. अशा सिगरेटच्या आहारी पाल्य जाऊ नये, यासाठी पालकांना पालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन देखील रामनगर पोलिसांनी केले आहे.

 विदेशी बनावटी ई सिगारेट विकणाऱ्या दुकानावर पोलिसांनी धाड टाकत दोघांना अटक करून हजारोचा मुद्देमाल  जप्त करण्यात आलं. शहरातील रामनगर परिसरातील दोन दुकानात विदेशी बनावटी ई सिगारेट व वेब फ्लेवर अवैद्य साठा करून  बेकायदेशीर पणे विकल्या जात असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच त्या दोन्ही दुकानावर धाड टाकून चौकशी करत  40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं.  ई सिगारेट ही पेनी सारखी दिसते आणि त्यालाचार्जिंग करावी लागते. शाळेतील लहान मुलं या ई सिगारेट चा अधिक वापर करत असल्याचे पोलिसांना एका तपासात निदर्शनात आलं. अधिक चौकशी केली असता त्यांना शहरात विकत असलेल्या दुकांनाची माहिती मिळाली व कारवाई करण्यात आली. गांजा, ड्रग्स पावडर नंतर आता विदेशी बनावटी ई सिगारेट बाजारात उपलब्ध झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.  अधिक तपास रामनगर पोलीस करीत आहे.SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.