गुरुवार, ऑक्टोबर ०६, २०२२

एसटीचा फुटला टायर; खासदारानी दिला प्रवाशांना मदतीचा हात | chandrapur news today live

खासदार बाळू धानोरकरांची दाखविले पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन


चंद्रपूर : संवेदनशील खासदार म्हणून बाळू धानोरकर (Suresh Narayan DhanorkarMember of the Lok Sabha) यांची ओळख आहे. अनेकदा त्यांनी कृतीतून दाखवून देखील दिले आहे. आज देखील चिमूर आगारातील एसटी बस चंद्रपूर येथे येत होती.ताडालीजवळ टायर फुटल्याने चार तासापासून उभी होती. चंद्रपूर येथे जात असतांना खासदार बाळू धानोरकर यांचे लक्ष गेले. त्यावेळी त्यांनी गाडी थांबवून प्रवाश्यांची विचारपूस केली. त्यावेळी दोन वयोवृद्ध प्रवासी उपचारासाठी ताटकळत होते. ही बाब लक्षात येताच खासदार बाळू धानोरकर यांनी स्वतःच्या गाडीत त्यांना चंद्रपूरला आणले. तसेच इतर प्रवाशांसाठी तत्काळ पर्यायी बस उपलब्ध करून दिली. खासदार बाळू धानोरकर यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल प्रवासी आणि नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.Read Also


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.