नदीच्या पात्रात आढळला वाघाचा मृतदेह - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑक्टोबर २९, २०२२

नदीच्या पात्रात आढळला वाघाचा मृतदेह

बाजारगाव परिसरात वाघिणीचा मृत्यू


गजेंद्र डोंगरे/ बाजारगाव - 
चनकापूर (माळेगाव) शिवारात सकाळी गावातील सुरेश गेडाम हे सकाळी शौचास गेले असता त्यांना नदीपात्रात वाघ पडून असल्याचे दिसले. तो हालचाल करीत नसल्याने संशय आला. गावातील पोलीस पाटील व सरपंच यांना माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच वन विभागाला कळविण्यात आले.  वनविभागाची चमू सायंकाळी ४ वाजता पोहचल्या मुळे पंचनामा होवू शकला नाही.
उपक्षेत्र उमरी (वाघ) नियत क्षेत्रं नेरी मानकर, कक्ष क्रमांक 151PF, पासून 1किमी चनकापुर माळेगाव बुजुर्ग प ह न क्र 51 येथील महसुल चे नाल्यामध्ये 3-4 वर्ष वयाची वाघीण मृत असल्याचे दिसून आले.
The body of a tiger was found in the river bed
लागलीच वरिष्ठ अधिकारी यांना कळविण्यात आले. रात्र झाल्याने शव विच्छेदन दुसऱ्या दिवशी सकाळी करण्याचे ठरले. सकाळी हिंगणा वनपरिक्षेत्र चे कर्मचारी यांनी NTCA च्या मार्गदर्शन सूचना नुसार कार्यवाही केली. तसेच NTCA प्रतिनिधि अजिंक्य भटकर मानद वन्यजीव संरक्षक, PCCF (wildlife) चे प्रतिनिधि यांचे समक्ष पंचनामा तयार करण्यात आला. तर शवविच्छेदन हे पशू वैद्यकीय अधिकारी यांनी केला. प्राथमिक माहिती नुसार वाघिणीचा मृत्यू हा हृदय श्वसनक्रिया बंद पडल्याने ( Cardiac respiratory failure) झालेला असल्याचे दिसून आले आहे. फॉरेन्सिक करीता नमुने घेण्यात आले असुन RFL नागपूर येथे पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानंतर दहन पंचनामा नोंदवण्यात आला. 
याकरिता मा. श्री रंगनाथ नईकडे, मुख्य वनसंरक्षक नागपूर वनवृत्त यांचे मार्गदर्शना खाली उपवसंरक्षक श्री पी जी कोडापे यांनी कार्यवाही केली असुन पुढील तपास श्री आशिष निनावे सहायक वनसंरक्षक (अतिरिक्त कार्यभार) नागपूर हे करित आहेत.
 सरपंच पोलीस पाटील यांना घटनास्थळी जाण्यास मनाई
वास्तविक पाहता वन विभागाने गावातील सरपंच पोलीस पाटील यांना पंचनामा करताना बोलावाले लागते. परंतु तसे झाले नाही तर वृत संकलन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना सुद्धा माहिती दिली नाही. व घटना स्थळी जाऊ सुधा दिले नाही. 

नदीपात्रात वाघाचा मृतदेह कसा? 
या घटनेनंतर वाघाचा मृत्यु विध्धुत करंट लागून मेला असावा व नंतर वाघाचा मृतदेह नदीपात्रात आणून टाकल्याचा संशय गावकरी करीत असून वन विभाग तपास लावणार का? अशी उलट सुलट चर्चा गावकरी करीत आहे. 
व वन विभाग यांनीच सर्व कर्मचारी घेऊन पंचनामा व गावातील सरपंच पोलीस पाटील मान्यवर व्यक्ती यांच्या कुणाही एकाच्यातरी समोर पोस्टमार्टम केले त्यामुळे गावातील लोकांना उलट सुलट चर्चा करण्याची संधी मिळाली


घटनास्थळी डॉग स्कॉट उपलब्ध
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वाघ हा मारला की मारून टाकला त्यामुळे घटनेची शहानिशा करण्याकरिता डॉग ला पाचारण करण्यात आले होते