गोंदिया व भंडाराचे अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपञ तपासणी संयुक्त कार्यालय गोंदियात सुरू. झाली आद़िवासी विद्यार्थ्यांची सोय. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, ऑक्टोबर १७, २०२२

गोंदिया व भंडाराचे अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपञ तपासणी संयुक्त कार्यालय गोंदियात सुरू. झाली आद़िवासी विद्यार्थ्यांची सोय.


 


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध-: दि. १७ ऑक्टोबर:-
अनुसुचित जमाती जात वैधता प्रमाणपञ तपासणी समिती गोंदिया शासन निर्णय,आदिवासी विकास विभाग क्र एस.टी सी.- १९/प्र क(३४) का दा १३ -सप्टे - बर २०१९ अन्वये समिती स्थापण करण्यात आली :समिती स्थापण झाल्यानंतर समितीचे कार्यालय आ वि विभाग शासन निर्णय एस टीसी २०१९-प्र क्र ३४/१०_दि.२० मे २०२१अन्वये नागपूर २ या नावाने स्थापण करून समितीचे मुख्यालय ठेवण्याचे आदेशित करण्यात आले होते.त्याअनुसंघा ने गोंदिया समितीच कार्यालय हैद्राबाद हाऊस बरेक क्र. १०, नागपूर येथूनच कार्यरत होते.मग नंतर शासन दि१९जून २०२२ पासून मुळ ठिकाणी समिती कार्यालय सुरू करण्याच्या सुचणा शासन स्तरावर देण्याचे ठरले. म्हणुन ११ जुलै २०२२ पासून गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय दुसरा माळा कक्ष क्रमांक २१४ व २०९ मध्ये सुरू करण्यात आलेले आहे.व जात वैध्यता प्रमाणपञ प्राप्त करण्यासाठी आदिवासी बांधवाकडून अर्ज सुध्दा नियमितपणे घेणे सुरूआहे.सदर कार्यालय गोंदिया व भंडारा या संयुक्तिक जिल्ह्यासाठी कार्यक्षेञ निश्चित केले असल्याने भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थ्यांना जात वैध्दता प्रमाण पञ गोंदिया येथुनच जास्तीत जास्त लाभ घ्यावा.असे सहआयुक्त अनुसूचित जमाती तपासणी समिती गोंदिया यांनी आवाहन केले आहे.यामुळे समाज बांधवानी यानंतर नागपूर येथे जाण्याचे टाळा‌वे व प्रवासावर होणार खर्च टाळावा व समाजात सदर सर्वञवॄत प्रसारित करावे असे आवाहन सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स संघटना यांनी समाज बांधवाना केले आहे.