कवठा गावात रात्रभर हत्यांचा हैदोस. धान पिकाची प्रचंड नुकसान. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, ऑक्टोबर १७, २०२२

कवठा गावात रात्रभर हत्यांचा हैदोस. धान पिकाची प्रचंड नुकसान.


नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी
 


बिबट,पट्टेदार वाघ, रान डुकरे,हत्ती यांच्या धुडगूसाने शेतकरी व नागरिकात प्रचंड दहशत.संजीव बडोले, प्रतिनिधी.

नवेगावबांध :-८ ऑक्टोबर:-
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध वनक्षेत्रातील कवठा,बोळदे या गावातील शेतात हत्याच्या कळपाने काल रात्री ८.०० वाजेपासून  हैदोस घालून,सात शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड नुकसान केली आहे. गेल्या 28 सप्टेंबर पासून गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात हत्याच्या कळपाने प्रवेश केला होता. तेव्हाही सुकळी येथील शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान हत्यांनी केली होती. 4 ऑक्टोंबर ला मौजा तिडका येथील एका शेतकऱ्याला एका हत्तीने चिरडल्यामुळे स्वतःचा जीव गमवावा लागला होता तर एक शेतकरी जखमी झाला होता. त्यानंतर पुन्हा या हत्यांचा मोर्चा कवठा बोळदे या गावाकडे काल रात्री वळला रात्री आठ वाजेपासून तर सकाळपर्यंत या कडपाने शेतकऱ्यांच्या धानपिकांचे शेतात रात्रभर धुळघुस घालून प्रचंड प्रमाणावर नासधूस केली आहे त्यामुळे कवठा येथील ७ शेतकऱ्यांचे धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान नवेगावबांध सानगडी मार्गावर रेल्वे फाटकाच्या खाली नवोदय विद्यालय परिसरात रानडुकरांचा हैदोस वाढला आहे कधी दिवसाढवळ्या तर कधी रात्रीला रान डुकरे शेतामध्ये येऊन धान पिकांची प्रचंड नुकसान करीत आहेत. दोन ऑक्टोबरला सावरटोला या गावात बिबट वाघाने तीन शेळ्यांचा फरसा पाडला होता.तर भुरसीटोला, भिवखिडकी परिसरात ३ आक्टोंबर ला,तसेच तीन-चार दिवसा अगोदर सायंकाळच्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच सिलेझरीच्या जंगलात सिटी वन या पट्टीदार वाघाचा वावर असल्यामुळे वन विभागाने शेतकऱ्यांनी दोन ते तीन दिवस शेतामध्ये न जाण्याचे आवाहन केले आहे त्यामुळे हत्ती रानडुकरे व पट्टेदार वाघ या वन्य प्राण्यांमुळे सध्या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकात वाघ बिबट व हत्ती यांचे दहशत पसरली असून शेतकऱ्यांना एकीकडे जीवाची भीती तर दुसरीकडे शेतातील तोडणीला आलेल्या धान पिकांची होणारी नुकसान याची भीती सहन करावी लागत आहे कवठा येथे वन विभागाने हत्यांच्या कळपाजवळ न जाता गावात राहूनच टायर जाळून, फटाके फोडून हत्यांना पळवून लावण्याचे प्रयत्न करावे,असे आवाहन करण्यात आले होते. तरी पण असं असताना शेतकऱ्यांना धान पिकांचे प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. हत्यांच्या कळपामुळे व रानडुकरांमुळे झालेल्या धान पिकांचे नुकसान भरपाई शासनाने द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
केसरी जवळील जुनी चिचोली या परिसरात वाघांच्या बछड्याचे दर्शन झाल्याने,त्या परिसरातही वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे.काळी माती,कवलेवाडा परिसरात एक वाघीण व तीन बछडयांचे दर्शन अनेक नागरिकांना झाल्याचे ऐकिवात आहे. कदाचित हत्यांच्या भीतीने हे वाघ केसरी परिसरातील जुनी चिचोली परिसरात स्थलांतरित झाली असावी. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कवठा शेत शिवारात हत्तीचा हैदोस

नवेगावबांध :-
नवेगाव बांध वनपरिक्षेत्र अंतर्गत कवठा वनक्षेत्रात लगत शेतशिवारात रानटी हत्यांच्या कळपाणे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान केले असून शेतकरी मेटाकूटीला आलेला आहे कित्येक प्रकारचे वन्यप्राणी शेत पिकाचे नुकसान करीत असतात परंतु वन विभागाकडून मिळणारी मदत ही फारच अल्प असून त्यामध्ये तिप्पट वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेले आहे त्याचप्रमाणे ज्यांचे सतत तीन-चार वर्षांपासून नुकसान होत आहे व आतापर्यंत ज्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्य क्रमाने जाळीचे किंवा ताराचे कंपाउंड देऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.आजही ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची,त्यावर अवलंबून राहणार्‍या शेतमजूर कष्टकरी, लोकांची धूरा या शेतीवर अवलंबून आहे व हेही असेच नष्ट होत राहीले तर एकदिवस याच शेतकऱ्यांना गाव सोडून पलायन केल्या शिवाय पर्याय उरणार नाही.रोज वन्यप्राण्यांकडून प्रत्येक गावातील शेतीपीकाचे, व पाळीवपशूचे तसेच मानवजीवाचे नुकसान  दर दिवशी पहायला मिळत आहे .

  कवठा शेत शिवारात काल शुक्रवार रात्री आठच्या दरम्यान हत्तीच्या कळपाणे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान केलेले आहे यामध्ये ,ऋषी काशीराम बहेकार, सिताराम कवडू मेंढे, नरेंद्र खुशाल मेश्राम, गजानन खुशाल मेश्राम, बंडू रामटेके ,देवदास चिमणकर, मारुती सावुस्कार या शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर हत्तीच्या कळपाने नुकसान केलेले आहे कवठा परिसरात तसेच बोडदा परिसरात या हत्तीच्या कळपांची धास्ती शेतकऱ्यांनी घेतलेली आहे रात्रीच्या वेळी सदर हत्तीचा कळपाने गावांमध्ये येऊन जीवितहानी व वित्तहानी  करणार नाही याच्या दहशतीत संपूर्ण गावातील लोक आहेत तर वन विभागाकडून रात्रीची गस्त लावून त्यांच्यावर पाडत ठेवलेले आहे गावाशेजारी टायर पेटवून लोक हत्तीला गाव व शेतापीका पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत तरीही हत्ती रात्रीच्या वेळी गावातील शेतशिवारात येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत तर रात्रभर शेतातील नुकसान करून पहाटेच्या सुमारास जंगलात पळत जात आहेत व त्या ठिकाणी दिवसभर वास्तव्य करून पुन्हा रात्री शेतीच्या दिशेने आपला मोर्चा वळवून मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे वन विभागाने याची दखल घेऊन या वर उपाययोजना करावी व शेत पिकाचे होणारे नुकसान त्यावर येणारा खर्च लक्षात घेता शासनाने तात्काळ जीआर मध्ये बदल करून हेक्टरी मिळणारी बदल ही वाढवून द्यावी व आता निकषाप्रमाणे एका हेक्टरला 25000 पर्यंत किंवा एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 25 हजारापर्यंतची नुकसान ग्राह्य न धरता ती तीन ते चार पटीने वाढवून देण्यात यावी व शेताच्या चारी बाजूला उपाययोजना म्हणून जाडीचे व ताराचे कंपाउंड देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे व प्रशासनातील शासकीय अधिकाऱ्यांकडे व महाराष्ट्र शासनाकडे केलेली आहे.