बारावीच्या आदित्यने साकारला भारद्वाज स्युडो सॅटेलाईट - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, ऑक्टोबर ०३, २०२२

बारावीच्या आदित्यने साकारला भारद्वाज स्युडो सॅटेलाईट
निती आयोगाच्या अटल ईनोवेशन मिशन द्वारे आयोजित ATL Marathon 2021-22 या राष्ट्रिय स्तरावरिल स्पर्धे मध्ये श्री शिवाजी सायन्स ज्युनिर काॅलेज मिधील 12 व्या वर्गात शिकत असलेल्या चि. अादित्य राजेंद्र ठाकरे याने विजय संपादन केला आहे.
ह्या स्पर्धेमध्ये देशभरातल्या जवळपास 20,000 विझान जिझासुं विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता भारतातील सुमारे 8000 शाळांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.

या वेळी तब्बल 10000 हुन अधिक शोध प्रयोगे निती आयोगा कडे सबमिट करण्यात आली या शोध प्रयोगांतुन निवडक 350 शोध प्रयोगांना विजयी घोषित करण्यात आले अादित्य हा या प्रयोगांमध्ये अव्वल ठरला महाराष्ट्र राज्यातील निवडां मध्ये सुध्दा त्याने शिर्ष स्थान प्राप्त केले.या स्पर्धेच्या अंतर्गत "भारद्वाज स्युडो सॅटेलाईट" नावाचे एक संपुर्ण पणे सौर उपग्रह त्याने तयार केला हा उपग्रह आपल्या श्रेणीतला भारतातील प्रथमच उपग्रह आहे.

हि शोध प्रक्रिया पंडित बच्छराज व्यास विद्यालयात असलेल्या अटल टिंकरिंग लॅब मध्ये करण्यात आली, तेथील ATL Incharge सौ. रेणुका म. खळतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्राचार्या सौ. अर्चना जोशी यांनी त्याने अभिनंदन केले. भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री संजयजी शिरपुरकर यांनी त्याचे कौतुक केले.
शिवाजी सायन्स ज्युनिर काॅलेज चे प्राचार्य श्री ढोरे यांनी त्याचे अभिनंदन केले.या प्रोजेक्ट मध्ये AR Tech Innovation चे श्री प्रथमेश काशेलिकर यांनी त्यास तांत्रिक सहाय्य प्रदान केले.