गुरुवार, ऑक्टोबर २०, २०२२

राहुलजींच्या भारत जोडोत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा : खासदार बाळू धानोरकर यांचे आवाहन


चंद्रपूर- काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. नोव्हेंबरमध्ये ही यात्रा महाराष्ट्रातून पुढील प्रवास करणार आहे. त्यात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन यात्रेला आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन चंद्रपूर खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.या यात्रेत राज्यातील लाखो काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक यात्रेत सहभागी होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली 25 हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने यात्रेत सहभागी होणार आहेत. हजारो तरुण बाईक रॅली काढून यात्रेला आपला पाठिंबा देणार आहे. भारत जोडो यात्रेचा 3500 किमीचा प्रवास हा काँग्रेस पक्षासाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. ही भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरपासून महाराष्ट्रमध्ये येत आहे. सात ते 11 नोव्हेंबर दरम्यान ती नांदेड जिल्ह्यात, 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान हिंगोली जिल्ह्यात, 15 ते 16 नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात, 16 ते 18 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात आणि 18 ते 20 रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यात मार्गाक्रमन करणार आहे. 

या यात्रेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षातील नेते आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.