दूध डेरी परिसरात गांजा घेऊन जाणाऱ्या आरोपीस अटक - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑक्टोबर ०८, २०२२

दूध डेरी परिसरात गांजा घेऊन जाणाऱ्या आरोपीस अटकदोन किलो 314 ग्रॅम गांजा वनस्पती वीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीस रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. सुजन जितेन मालो (वय तीस वर्ष) राहणार रेल्वे पटरीजवळ शंकर लनगर बंगाली कॅम्प चंद्रपूर असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दुचाकीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरी यांच्या नेतृत्वामध्ये गुप्तहेर यांच्या प्राप्त माहितीनुसार गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.
Accused carrying ganja arrested in Dudh Dairy area
चंद्रपूर शहरातील दूध डेरी ते सावरकर चौक येथे नाकाबंदी करून संशयास्पदरीत्या जाणाऱ्या एका व्यक्तीस थांबवण्यात आले, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एका थैलीमध्ये गांजा आढळून आला. या गांजाची किंमत वीस हजार तीनशे रुपये इतकी असून, या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.