रविवार, ऑक्टोबर ०२, २०२२

आर्वी,आष्टी,कारंजाच्या शेतकऱ्यांनी दीड तास रोखून धरला राष्ट्रीय महामार्ग

माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात
तालुक्यातील हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर
शेतकऱ्याला पांगवण्यासाठी पोलिसांचा
 सौम्य लाठी चार्ज
प्रतिनिधी:कारंजा घाडगे;जगदीश कुर्डा
आर्वी विधानसभा मतदार संघातील आर्वी आष्टी कारंजा या तिन्ही तालुक्यामध्ये जिल्ह्यातील वनक्षेत्र पैकी जवळपास 60 ते 70 टक्के विस्तारित क्षेत्र आहे. मागील काही वर्षापासून वनक्षेत्रातील हिंस्र प्राणी वाघ बिबट अस्वल इत्यादी प्राण्यांचा मानवी वस्तीवर वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.  त्यामुळे त्यांच्यापासून झालेल्या हल्ल्याच्या घटना मध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. आर्वी खरांगणा रेंजमध्ये 12 मनुष्यहानी व 393 पशुधन हानी च्या घटना घडलेल्या आहे.

या शेतकऱ्याच्या मृत परिवाराला शासकीय नोकरी व 50 लाख रुपये तात्काळ मदत करावी यासाठी आज गांधी जयंती व लालबहादुर शास्त्री जयंतीनिमित्त कारंजा तालुक्यातील हेटी कुंडी फाट्यावर राष्ट्रीय महामार्गावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थित माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात जवळपास दीड तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. त्यामुळे अमर काळे यांनी आव्हान केले या वन्य प्राण्यांची लवकरात लवकर प्रशासनाने बंदोबस्त करावा त्याचप्रमाणे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला तात्काळ नोकरी द्यावी. तसेच कुटुंबाला 50 लाखाची आर्थिक मदत करावी नाहीतर पुन्हा यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा केली.

या आंदोलनाच्या वेळी प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्त चोख ठेवलेला होता. पोलीस विभागाकडून पोलीस उपविभागीय अधिकारी साळुंखे त्याचप्रमाणे कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजपूत पोलीस कर्मचारी वर्धा येथून आलेले दंगल विरोधी पथक मोठ्या संख्येने फौंज फाटा उभारण्यात आलेला होता.

मोठा अनर्थ टळला
हेटी कुंडी फाट्यावर झालेल्या चक्काजाम आंदोलन नात मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते त्यावेळी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले त्यांचे नातेवाईक लहान मुले व गावकरी आंदोलनात सहभागी झाले पोलिसांना लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्ग खुला करणे महत्त्वाचे होते. पोलिसांनी जबरदस्तीने महामार्ग मोकळा करण्यासाठी सुरुवात केली. 

 त्यावेळी शेतकऱ्यावर सौम्य लाठीचार्ज करायला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकरी चिडले शेतकरी व पोलिसांत बाचाबाची सुरू झाली याचाच गैरफायदा काही उपद्रवी तत्वांनी घेऊन पोलिसांवर गोटे मारायला सुरवात झाली. त्यामुळे पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात आणली नसती तर अनुचित प्रकार घडण्याची संभावना नाकारता येत नव्हती.

ही परिस्थिती चिघळत असतानाच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटना स्थळावरून पळ काढला.या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार अमर काळे यांनी केले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नितीन दर्यापूर कारंजा नगरपंचायत चे उपाध्यक्ष भगवान बुवाडे नगरसेवक विशाल इंगळे कमलेश कठाणे राजू लाडके हेमंत बन्नगरे त्याचप्रमाणे विजय बनसोड टिकाराम घागरे छोटू कामडी काँग्रेसचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.