Maharashtra | चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा हल्ला; 70 वर्षीय शेतकरी ठार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑक्टोबर २२, २०२२

Maharashtra | चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा हल्ला; 70 वर्षीय शेतकरी ठार

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा हल्ला; 70 वर्षीय शेतकरी ठार


महाराष्ट्र के चंद्रपुर जिले के ब्रह्मपुरी में बाघ द्वारा 70 वर्षीय किसान की हत्या: वन विभाग


70-year-old farmer killed by tiger in Brahmapuri in Maharashtra's Chandrapur district: Forest departmentसविस्तर बातमी | 

ब्रम्हपुरी तालुक्यातील कुडेसावली येथे वाघाच्या हल्ल्यात वृद्ध इसम ठार झाल्याची घटना आज दिनांक22 ऑक्टोंबरला दुपारच्या सुमारास घडली.सदाशिव रावजी उंदीरवाडे रा. कुडेसावली वय 70वर्षअसे वाघांच्या हल्ल्यांत ठार झालेल्या वृद्ध इसमाचे नाव आहे. 


सदाशिव रावजी उंदीरवाडे हे स्वतःच्या शेतावर धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता बांधा आड दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून इसमाला ठार केले. व शेतालगत असलेल्या जंगलात वाघाने मृतदेह जंगलात ओढत नेले.वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची आठवड्यातील ही दुसरी घटना असून तीन दिवसांपूर्वी वाघाने हळदा येते महिलेला ठार केले होते.

वाघाच्या वाढत्या हल्ल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.वारंवार वाघाच्या हल्ल्यांच्या घटनात वाढ होत असून अनेकांना यात जीव गमवावा लागला आहे.मात्र वनविभागाने वाघांच्या बंदोबस्तासाठी अद्याप ठोस पावले उचलली नसल्याने वनविभागाप्रती तीव्र संताप व्यक्त केला आहे.वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना मिळतात घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरिय तपासणी करिता ब्रह्मपुरी पाठविले.

Sadashiv Undirwade of Kudesaoli village was at his farm near a forested patch when a tiger lurking in the thicket pounced on him, killing him on the spot, the Chandrapur Territorial Circle official said.

“The kin of the deceased has been given initial compensation. Villagers have sought that the big cat be captured by setting up cages in the vicinity,” he said.

On October 20, a 40-year-old woman identified as Rupa Ramchandra Mhaske was killed by a tiger near Halda village in Bramhapuri tehsil.