वरसिद्धी मॉलच्या माध्यमातून ३०० कर्मचाऱ्यांना रोजगार मिळणार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, ऑक्टोबर १९, २०२२

वरसिद्धी मॉलच्या माध्यमातून ३०० कर्मचाऱ्यांना रोजगार मिळणार


सिद्धीपेठ, वणी, हिंगणघाट, वडसा, नागपूरच्या ठिकाणी कपडे घेण्याच्या फेऱ्या थांबेल*

*उच्च प्रतीचा दर्जेदार कापड चंद्रपूरातच मिळणार*

*खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन*चंद्रपूर : जन्माला आलेल्या बालकापासून जगाचा निरोप घेणाऱ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनाच आयुष्य जगताना लागणारे सर्व कपडे आणि इतर साहित्य मॉलमध्ये उपलब्ध आहेत. आधी उच्च प्रतीचा दर्जेदार कापड खरेदी करण्याकरिता चंद्रपूरकरांना सिद्धीपेठ, वणी, हिंगणघाट, वडसा, नागपूर येथे जावे लागायचे. मात्र आता या मॉलमुळे सर्वकाही चंद्रपूर येथेच मिळणार आहे. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याच्या बाजारपेठेत समृद्धी आणण्यासाठी आणि इथल्या विकासासाठी हातभार लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातला पैसा जिल्ह्यातच राहणार आहे. शिवाय या मॉलच्या माध्यमातून स्थानिक ३०० युवक - युवतींना रोजगार मिळणार आहे. हि बाब चंद्रपूरसाठी अत्यंत कौतुकाची असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कस्तुरबा मार्गावर वरसिद्धी मॉलचे लोकार्पण खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख आकर्षण म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री रिंकु राजगुरू यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, माजी महापौर राखीताई कंचर्लावार, पोलीस निरीक्षक सुधाकर अंबोरे, वरसिद्धी मॉलचे व्यवस्थापक अनिल कुमार चल्लावार, साईकृष्णा चल्लावार, धनपाल सूर्यनारायणा, रतया सेठ, जी. वि. मुर्ली, ची. राजेंद्र, दर्शन बुरडकर यांच्यासह पोलिस विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर हे यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्याच्या मधोमध वसलेले शहर आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील ग्राहक सुद्धा खरेदीसाठी चंद्रपूरमध्ये येत असतात. या मॉल च्या माध्यमातून चंद्रपूर शहरांमध्ये एक भव्य दिव्य खरेदीचे केंद्र उभे झाले आहे. हैदराबाद सारख्या ठिकाणाहून प्रारंभ झालेल्या या मॉल्सच्या शाखा देशभर वृद्धिंगत व्हाव्यात, अशा शुभेच्छा खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.